जुन्नर /आनंद कांबळे
करोना सारख्या आपत्तीवर मात करण्यासाठी यापुढील काळात योगच वरदान ठरेल असे मत योगाचार्य कृष्णा जोशी यांनी व्यक्त केले.वयाच्या ९१ व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी दिनचर्या,१५० जोर,१५० बैठका असा शरीर तंदुरुस्तीचा नियम जपणारे श्री जोशी यांनी जुन्नरला योगवर्गाचे मार्गदर्शन केले,त्यावेळी ते बोलत होते.जुन्नर विकास मंच संचलित योग वर्गातील सदस्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक योगा यासाठी ते उपस्थित होते.नाक,कान,घसा,डोळे,यांच्या आरोग्यासाठी आनंददायी योगक्रियांची प्रात्यक्षिके त्यांनी उपस्थितांकडून करून घेतली.दीर्घ श्वसन व्यायाम,प्राणायाम,ओंकार यांचे कृतींनी श्वसनमार्गात कंपने वृद्धिगंत होतात,त्यामुळे करोनासारख्या आपत्तीत फायदा होतो असे ते म्हणाले.सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काजळे यांच्या प्रयत्नातून हा योगाभ्यास वर्ग महालक्ष्मी लॉन्स येथे सुरक्षित वापराचे नियम पाळून पार पडला.या योगाभ्यास वर्गाचा प्रसार खेडोपाडी करण्याचा उद्देश असल्याचे श्री .काजळे यांनी सांगितले.अष्ट योगातील यम,नियम,आसन,प्राणायाम,प्रत्याहार,ध्यान,धारणा,संयम यविषयीचे महत्व यावेळी विषद करण्यात आले.जुन्नर विकास मंचाचे संयोजक पवन गाडेकर,ॲॅड प्रविण वाघमारे यांनी यासाठी परिश्रम घेतले.
९१ व्या वर्षी शिवनेरीवर चढाई
कृष्णा जोशी यांनी,कुठेही न थांबता वयाच्या ९१ व्या वर्षी किल्ले शिवनेरीवर चढाई केली.योगाभ्यास आणि योगसाधनेतून शरीरयष्टी समृद्ध केल्याने,या वयात शारिरिक श्रमाचे कष्ट जाणवत नाहीत असे ते म्हणाले.