Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १४, २०२०

राज्यात वॉटर ग्रीडची स्थापना करावी - नितीन गडकरी

 


मुंबईतील पूर समस्या हाताळण्यासाठी राज्यात वॉटर ग्रीडची स्थापना करावी - नितीन गडकरी


मुंबई नागपूर |ऑक्टोबर 14, 2020

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील पुराच्या नियमित संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात 'राज्य वॉटर ग्रीडची स्थापना करण्यास सूचविले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी सांगितले कीवॉटर ग्रीडची स्थापना केल्यानंतर दुष्काळी भागांमध्ये पाण्याची उपब्धता सुनिश्चित करता येईल.

जसे आपण पाहतो कीमुंबईत दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होते. म्हणूननुकसान टाळण्यासाठी पुरस्थिती हाताळण्यासाठी एकात्मिक आराखड्याची आवश्यकता आहेअसे गडकरी म्हणाले. ते पुढे म्हणालेव्यवस्थित नियोजन केले तर पुराचे पाणीसांडपाणी आणि गटारांतील पाणी ठाण्याकडे वळवता येईल आणि वळवण्यात आलेले पूर्ण पाणी प्रक्रिया करुन धरणात साठवता येईल. हे पाणी जलसिंचनशहराजवळील उद्योग आणि आसपासच्या फलोत्पादन पट्ट्याला देता येईल. अतिरिक्त पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागाकडे नेता येईल. शाश्वत उपाययोजना म्हणून मुंबई आणि उपनगरांतील मोठ्या वसाहतींमध्ये पाणी प्रक्रिया केंद्राची स्थापना करता येईल.   

मंत्री म्हणाले मुंबईतील पूराची समस्यानाले व्यवस्थापनसांडपाणीपिण्याचे पाणी हे विषय एकमेकांशी संलग्न आणि सुसंगत आहेतत्यामुळे याविषयी एकात्मिक विचार करण्याची आवश्यकता आहे. ही समस्या केवळ मुंबई शहरापुरती मर्यादीत नाहीत्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने तसेच आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मदतीने राज्य सरकारने तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करावाअसे गडकरी यांनी सांगितले. 

नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते विकास आणि महामार्ग विभागाची जबाबदारी असल्यामुळेत्यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट रस्त्यांमध्ये रुपांतर करावेअसे सांगितले. डांबरी रस्ते मुंबईतील पावसात टिकणारे नाहीतहे सांगत मंत्र्यांनी दोन दशकांपूर्वी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग अद्यापही सुस्थितीत असल्याचे उदाहरण दिले. याच धर्तीवरमल:निस्सारण आणि पूराचे पाणी वाहून नेण्यासाठी प्रगत जलवाहिनी प्रणालीसह काँक्रीटचे रस्ते मुंबईत बांधले जाऊ शकतातअसे म्हणाले. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जल वाहतूक उपक्रमाला पाठिंबा द्यावाअसे गडकरी म्हणाले. मुंबई पोर्ट ट्रस्टने यापूर्वीच जलवाहतूक सेवा आणि समुद्री पर्यटनासाठी योजना आखली आहेज्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी असण्याबरोबरच देशाच्या सागरी वाहतूक आणि पर्यटनाचे केंद्र ठरेल. 

गडकरी  यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारराज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणजलस्रोत मंत्री जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.      


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.