Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १४, २०२०

काटोल येथून किसान रेल्वेचा शुभारंभ



काटोल:- काटोल तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी यांचा शेतमाल देशातील मुख्य बाजार पेठे मध्ये विकता यावा यादृष्टीने काटोल येथे मा. ना. अनिल देशमुख (गृहमंत्री) यांच्या प्रयत्नाने किसान रेल्वेचा थांबा मिळाला असून संत्रा वाहतूक काटोल ते दिल्ली पहिल्या फेरीचा शुभारंभ १४ ऑक्टोबर २०२० ला मा. श्री. तारकेश्र्वर् शेळके सभापती कृ. उ.बा.समिती यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ पार पडला. तालुक्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एका रेल्वे व्हागान मध्ये २३ टन संत्रा दिल्लीला विक्रीला पाठवला रेल्वेची ही सुविधा मिळाल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना देशातील कोणत्याही बाजार पेठेमध्ये आपला शेतमाल विक्रीला पाठवता येईल, शेतकऱ्यांना १०० टन वाहतुकीसाठी ५०% अनुदान तर व्यापाऱ्या करिता ५०० टन वाहतुकीसाठी ५०% सवलत मिळणार आहे तसेच शेतकरी संबंधित संस्थेकरिता १००० टन वाहतुकीसाठी अनुदान मिळणार आहे.
यावेळी काटोल रेल्वे स्थानकांवर जी. प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले, बापुराव सातपुते, गणेश चन्ने, संजय धोटे, संजय डांगोरे, अजय लाडसे, शब्बीर शेख, अयुब पठाण, माणिकराव लांडे, अनिल ढोकणे, भैय्याजी रोकडे, असलम खोजा, पंकज‌ मानकर, गणेश केला, अमित काकडे, मनिष पालिवाल, राजन देशमुख, मोरेश्वर मानकर, जिवन चरडे, निशिकांत नागमोते, राजु डेहनकर, पराग दाते, नितीन नागपुरे, व्यापारी बांधव, शेतकरी ‌
उपस्थित होते.

काटोल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंभी उत्पादक शेतकरी आहे तसेच भाजीपाला मध्ये कोबी, वांगी उत्पादक शेतकरी आहे यादृष्टीने किसान रेल्वेमुळे काटोल येथे थांबा मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशातील दिल्ली मुख्य बाजार पेठे मध्ये पाठवून विक्री करण्यात येईल.
- तार्केश्र्वर शेळके
सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.