Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०४, २०२१

शिक्षकांनी उभारली ऑनलाईन क्लासरूम व क्वेश्चन बॅक online school 🏫




स्पर्धा परीक्षा देणा-यांना ही ठरत आहे साह्यभुत


वेलतूर/बातमीदार शरद शहारे
कोविड- 19 च्या प्रादुर्भावाने कुलूपबंद झालेल्या शाळा आता दिड वर्षानंतर ऑनलाईन सुरू झाल्या आहेत मग त्या ऑनलाईन झालेल्या शाळांना ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी चक्क स्वनिर्मित ऑनलाईन क्लासरूम व क्वेश्चन बॅक तयार करून आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान गावातील झोपडीसह घराघरात पोहचविले आहे. महागड्या ऑनलाईन शैक्षणिक सेवा पुरवीण्या-या खाजगी कंपन्यांवर ही बॅक उतारा ठरली असुन स्पर्धा परीक्षाची तयारी करण्या-या विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी ती चांगलीच उपयुक्त ठरत आहे.
गणित, सायन्स, भाषा, इतिहास ह्या विषयावर वर्गवार व प्रकरणवार असंख्य प्रश्न त्यांनी तयार करून आपल्या क्वेश्चन बॅकेत ठेवली आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्यांचे पर्याय ही सुचवले आहेत. युआर कोड, पॅडकास्टीगं सुविधांमुळे ते अधिकच सुविधांजनक झाल्याचे मत अभ्यासक व जानकार व्यक्त करत आहेत. त्यांच्या ह्या उपक्रमांचा लाभ भंडारा जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड येथील अनेक खाजगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी करून घेतला आहे.
 उपक्रमशिल शिक्षकांच्या स्वनिर्मित गुगल क्लासरूम( Google classroom )मधील क्युज असायमेटं( Quiz Assignment) च्या सहाय्याने त्यांनी ही किमया साधली आहे. 
 जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिखला (हिंदी)  पं.स. तुमसर जि.प. भंडारा या शाळेतील शिक्षक  उमेश बाबुराव ठाकरे ,  जगदिश भिवा फाले व कु. रेहाना मुमताज खान यांनी गुगल क्लासरुम च्या सहाय्याने वर्गनिहाय व विषयनिहाय तसेच शिष्यवृत्ती परीक्षेकरीता अनेक बहुपर्यायी ही प्रश्नसंच तयार केले आहेत. सदर प्रश्नसंचाची लिंक पालकांच्या व्हाटस एप (Whatsaap) वर पाठविली जाते. विद्यार्थी प्रश्नसंच मोबाईलवर सोडवितात व स्कोर स्वत: तपासतात. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांच्या करीता वर्कशीट तयार करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचविल्या जातात. गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सदर प्रश्न संचाची Google link पाठविली जाते. या उपक्रमाचा फायदा कोविड मधील लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम  ठेवण्यास मदतगार सिध्द होत आहे.  शाळेत उपलब्ध संगणक संचांचा वापर विद्यार्थी सदर प्रश्नसंच सोडविण्यास करतात. 


# मुख्याध्यापक उमेश ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात, परिणामी शाळेची पटसख्या 17 वरुन 87 वर पोहोचली आहे. @ वी.आर आदमणे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. तुमसर

Online Test for ZP School या Telegram वरील चॅनेलला Subscribe करुन सदर प्रश्नसंच कोणीही प्राप्त‍ करु शकतो. Invite link ( t.me/zpchikhalahindi) असुन  
शाळेचे फेसबुक account...... टाईप केल्यावर ते प्राप्त होते.
https://www.facebook.com/zpschool.chikhalahindi. (Facebook account)

 सदर उपक्रम राबविण्यास पंस तुमसरचे गटशिक्षणाधिकारी  वि. आर . आदमने , नाकाडोंगरी केद्राचे केंद्रप्रमुख  ए.सी. चकोले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 # शैक्षणिक सेवा करतांना अनेक समस्या येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर अधिकच येतात. कोरोना मुळे सारे थांबले आहे. शाळा बंद पडल्या  आहेत विद्यार्थी घरातच आहे. त्याला क्योश्चन बॅकमुळे मोठा शैक्षणिक आधार मिळत आहे. मुलांना  शैक्षणिक प्रवाहात कायम राहण्यास ह्यामुळे मदत होत आहे.  
@ डा. मनोहर नंराजे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, जि.प.नागपूर 
  
#प्रत्यक्ष वर्गाला सध्या बंदी आहे. त्यामुळे घरून ऑनलाईन अभ्यासासाठी क्वेश्चन बॅक मैलाचा दगड ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना माझे शैक्षणिक वर्षे वाया जात आहे ही भावना नष्ट होण्यास मोठी मदत होत आहे. 
@ जगदीश फाले, उपक्रमशिल शिक्षक

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.