काटोल शहरात चौकाचौकात सी सी टि व्ही बसविणार- गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख
# सोलार ग्रुप वतीने केले रुग्णवाहिका प्रायोजित
# सत्यनारायण नुवहाल यांचा नगरी सत्कार
# गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांचा पुढाकार
सुधीर बुटे/ काटोल :
विधान सभा क्षेत्रात वसंतराव देशमुख प्रतिष्ठान ,कोशिश फाऊंडेशन तसेच सोलार एक्सप्लोजिव्ह गृप ऑफ इंडिया च्या संयुक्त विद्यमाने काटोल विधानसभा मतदार क्षेत्रातील रुग्णांना वैद्यकिय उपचार सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या काटोल, कोंढाळी, नरखेड, मोवाड,सावरगाव,भारसिंगी करिता सहा 6 रुग्ण वाहिका व 1 शववाहिका असे एकूण सात 7 वाहने विजयादशमीच्या पावन पर्वावर रविवार दिनांक- २५ आक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर परिषद मेन रोड व्यापार संकुलपोलीस स्टेशन समोरचा परिसर येथे रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.भागाचा आमदार तथा राज्याचे गृहमंत्री ना अनिल देशमुख,सोलार गृप ऑफ इंडियाचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कोशिश फाऊंडेशनचे सलिल देशमुख यांचे हस्ते डॉ गोविंद भुतडा यांचे अध्यक्षतेत काटोल, मोवाड, नरखेड, कोंढाळी, भिष्णूर, लोहारी सावंगा येथील सहा जनप्रतिनिधी चे उपस्थित रुग्णवाहिका च्या चाब्या सुपूर्त करण्यात आल्या.
यापूर्वी ना अनिल देशमुख यांनी सवठा 2010 मधे सुद्धा पाच रुग्णवाहिका जनतेच्य आरोग्य सेवेकरिता लोकार्पित केल्या होत्या.आता अद्यावत सोईयुक्त नविन रुग्णवाहिका आपल्या माणसा कडून आपल्या जिवलग माणसांचे वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हाव्या या करीता कोशिश फाऊंडेशन व वसंतराव देशमुख प्रतिष्ठान व सोलार गृप ऑफ इंडिया माध्यमातून जन सेवेसाठी सहा रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आल्या आहेत.
सामाजिक कार्यात सोलारचे भरीव योगदान
सोलार एक्सप्लोजिव्ह गृह आफ इंडिया के चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी आपल्या सत्काराचे उत्तर देतांना सांगितले की कोंढाळी (चाकडोह)-व सावंगा येथील उद्योग समुह हे अतिसंवेदनशील उद्योग आहेत. या उद्योग समूहांचे सफलते करीता उद्योगसमूहात काम करणारे अनुभवी तांत्रिक अधिकारी व सर्व कामगारांच्या सहकार्याने एक्सप्लोजिव्ह क्षेत्रात लागणारे अवजारे बनविणाऱ्या उधोग समूहाची यशस्वी सेवा सुरू आहे . गृहमंत्री मंत्री ना. अनिल देशमुख यांनी काटोल -नरखेड भागातही अश्याच प्रकारे उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले आहे, तरी या अति संवेदनशील उद्योग सुरू करण्याबाबत लागणारी आवश्यक जागेची उच्यस्तरीय अधिकाऱ्या मार्फत पाहणी करून यावर मार्ग काढण्याचे ही आश्वासन उधोजक नोव्हाल यांनी दिले.
सोलारचे परिसरात सेवा
राष्ट्रीय महामार्ग कर 6 नागपूर अमरावती महामार्गावर चकडोह व शिवा सवंगा येथे एक्सलुसिव्ह व योग्य वापर व पुरवठा निर्मिती उधोग आहे. तर भारत सरकारनी त्यांचे करार करून देश संरक्षण करीता हँड ग्रॅनाईट, रॉकेट निर्मितीला मान्यता दिली असल्याने कंपनी संरक्षण क्षेत्रात विशेष महत्व आले आहे. असे कंपनीचे जनरल मॅनेजर सोमेश्वर मुंदडा यांनी माहिती दिली.सोलर उधोग कार्यक्षेत्र भारत देश शिवाय सहा पर राष्ट्रात कंपनीचे काम असून आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर कंपनीचा नंबर लागत आहे. सोलर उधोग समूह नागपूर शहर, कंपनी परिसरात वृक्षारोपण, प्रदूषण निर्मूलन , व्यसनमुक्ती, शैक्षणिक संस्था, सामाजिक व इतरांना विविध माध्यमातून प्रायोजित करीत असून हजारो कामगार परिवार उधोगवार आपला उदर निर्वाह आनंदात पार पाडत आहे.