आयजीसीई हेव्ही इंजिनिअरिंग लि.कंपनीचा मनमानी कारभार
जि.प.सदस्य प्रकाश खापरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
खापरखेडा-प्रतिनिधी
स्थानिक व कोराडी औष्णिक वीज केंद्राला लागणारा कोळसा वेकोलींच्या कोळसा खाणीतून वीज केंद्रात आणण्यासाठी कन्व्हर बेल्टचे काम युद्धस्तरावर सुरू आहे मात्र संबंधित कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून स्थानिक ४५ कामगारांना कामावरून कमी केले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आली आहे त्यामूळे जि.प.सदस्य प्रकाश खापरे यांनी सदर कामगारांना कामावर परत घेण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून २६ ऑक्टोबर सोमवारला भानेगाव ओपनकास्ट कोळसा खाण परिसरात कन्व्हर बेल्टचे काम बंद पाडले.
खापरखेडा व कोराडी औष्णिक वीज केंद्राला वीज निर्मिती करण्यासाठी लाखो टन कोळसा लागतो मात्र ईतर राज्यातून कोळसा आयात करण्यात येत असल्यामुळे ट्रान्स्पोर्टिंगला लाखो रुपये खर्च येतो परिसरात भानेगाव, शिंगोरी, गोंडेगाव ओपन कास्ट कोळसा खाण आहेत सदर कोळसा खाणी वीज केंद्राच्या अगदी जवळ असल्यामुळे ट्रान्स्पोर्टिंग जवळपास ६०० कोटी रुपये खर्च वाचने अपेक्षित आहे त्यामुळे ४०० कोटींची परीयोजना राबवून कोळसा खाण ते वीज केंद्रा पर्यंत कन्व्हर बेल्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे कन्व्हर बेल्टचे काम आयजीसीई हेव्ही इंजिनिअरिंग लि. कंपनीला देण्यात आले आहे सदर कंपनीने चार छोट्या कंपन्यांना कंत्राट दिले आहे नियमाप्रमाणे ८०% स्थानिकांना रोजगार देने अपेक्षित आहे मात्र रोजगार देण्यात आला नाही उलट वलनी, रोहना, सिल्लेवाडा, चनकापूर, भानेगाव, बिनासंगम परिसरातील ४५ कामगारांना कोणतीही सूचना न देता कोविड काळात कामावरून कमी करण्यात आले आहे कामगार कायद्या नुसार पी.एफ. ईएसआयसी, बोनस, किमान वेतन ईतर भत्ते देने बंधनकारक आहे मात्र देण्यात येत नाहीत किमान वेतनच्या नावावर कामगारांची पिळवणूक करण्यात येत असून त्यांना कामावरून कमी करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे हा सर्व प्रकार वीज केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांना माहीत आहे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे यासंदर्भात सदर कामगारांनी वलनी जि. प.सर्कलचे जि. प.सदस्य प्रकाश खापरे यांच्याकडे व्यथा मांडली २६ ऑक्टोबर सोमवारला सकाळी १० वाजता प्रकाश खापरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भानेगाव ओपनकास्ट परिसरातील सदर कंपनीचे कार्यालय गाठून त्यांना जाब विचारला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामूळे त्यांनी कन्व्हर बेल्ट काम बंद पाडले जो पर्यत स्थानिकांना कामावर परत घेणार नाही तो पर्यंत कन्व्हर बेल्टचे काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला त्यामूळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती सायंकाळी ४.३० वाजता कोराडी औष्णिक वीज केंद्रात चर्चे करिता आंदोलनकर्त्यांना बोलविण्यात आले असून आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे सदर प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे यावेळी रिंकू सिंग, युसूफ खान, नरेश खापरे, आकाश विश्वकर्मा, आकाश थोटे, विलास गुजरमाळे,पप्पू खान, इशाकभाई आदि मोठया संख्येने उपस्थित होते.