कोलकाता नाईट राईडर / दिल्ली डेक्कन मँच वर सट्टा लावताना चार आरोपींना अटक
* 13 लाख 38 हजार 598 रुपयाचा माल जप्त *
* नागपुर ग्रामिण गुन्हे अन्वेशन शाखेची कारवाही *
कोंढाळी वार्ताहर
येथुन 8 कि.मी. अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावरून लगतच्या मसाळा शिवारातील गुलमोहर फार्म हाऊस मधील काँटेज मध्ये कोलकाता नाईट रायडर विरुद्ध दिल्ली डेक्कन आईपीएल टि 20 क्रिकेट मँचवर सट्टा लिहितांना चार आरोपींना नागपुर ग्रामिण गुन्हे शाखा पोलीस व कोंढाळी पोलीस यांच्या संयुक्तमाने अटक करण्यात आली असल्याची घटना शनिवार 24 नोव्हेंबर ला सायकांळी 6 वाजताच्या सुमारास घडली
प्राप्त माहिती वरून नागपुर ग्रामिण गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की 24 नोव्हेबर ला इंडियन प्रिमीअर लीग अंतर्गत अबुधाबी युऐई येथे सुरु असलेल्या टि 20 जलद गतीच्या क्रिकेट सामना कोलकाता नाईट रायडर व दिल्ली डेक्कन च्या आईपीएल टि 20 क्रिकेट सामना मध्ये कोंढाळी परीसरातील मसाळा शिवारात गुलमोहर फार्म हाऊस च्या काँटेज मध्ये आईपीएल मँचवर सट्टा सुरु आहे लगेच नागपुर ग्रामिण गुन्हे शाखेच्या पोलीसानी व कोंढाळी पोलिसांनी धाड टाकुन गुलमोहर फार्म हाऊसच्या काँटेज मध्ये मोबाईल वरुन लोकाकडुन पैशाची बाजी लावुन हारजीतीचा जुगार खेळतांनी आरोपी दिनेश ताराचंद बन्सोड 52 धम्मकिर्तीनगर वाडी ( नागपुर ), अमोल शंकररार नाडीनवार 40 गजानन नगर वाठोडा नागपुर , प्रविण बंडुजी वाकडे 33 देशमुख ले आऊट कोंढाळी , अतुल गंगाधर दोडके 45 माळा काँलनी नरेद्र नगर नागपुर हे चार आरोपी मिळुन आले त्याच्या कडुन
1 मारोती इंडिगो कार किंमत 1,20000 ,8 मोबाईल संच 56000, 1 कँल्क्युलेटर, 32 इंच एलसीडी टिव्ही 20000, 1 टाटा स्काँय बाँक्स, 1 टाटा स्काँय छञी, जुगार लिहिलेले पाच कागद व पेन व इतर साहित्य सह एकुण 13 लाख 38 हजार 598 रुपयाचा माल जप्त केला गुलमोहर फार्म हाउस हे आरोपी ताराचंद बन्सोड यांच्या मालकीचे असल्याचे समजते त्याने नुकतेच हे फार्महाऊस विकत घेतल्याचे सांगण्यात येते हा आरोपी आय पी येल सुरू झाल्यापासून इथे मोबाईलवरून सटा चालवीत असल्याचेही समजते
आरोपींना कोंढाळी पोलीस स्टेशन ला हजर करुन फिर्यादी पो. उपनिरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणच्या तक्रारीवरुन आरोपींचे कृत्य कलम 4,5 मुंबई जुगार कायंदा अन्वये होत असल्याने सदर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
14 आँक्टोंबर ला सुद्धा नागपुर ग्रामिण गुन्हे अन्वेशन विभागाकडुन कोंढाळी परीसरातील इगल रिसोड वर जुगार खेळतांना 36 जणांना अटक करुन 42 लाख 73 हजार 320 रुपयाचा माल जप्त करण्यात आला होता हे विशेष!