शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची माजी आमदार निमकर यांची मागणी.
राजुरा ..जिल्हा चंद्रपूर...
मागील दोन दिवसात झालेल्या खाली वादळी व तुफान पावसामुळे राजुरा क्षेत्रातील खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झालेले आहे .हातात आलेले कापूस सोयाबीन व धानाचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या तोंडावर हातात पीक येईल या आशेने वर्षभर राबणाऱ्या शेतकरी बांधवांना समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राजुरा विभागातील नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेली आहे.
मागील दोन-तीन दिवसात राजुरा क्षेत्रांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला त्यामुळे या भागातील प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे राजुरा तालुक्यात साधारणपणे कापूस सोयाबीन धान मिरची हे महत्त्वाचे पीक घेतले जाते खरीप हंगाम आता संपत आहे . सोयाबीन व कापसाची काढणे सुरू आहे परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे मात्र अशातच मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे उभी पिके नष्ट झालेली आहेत सोयाबीन अति पावसामुळे जमिनीत रुजलेली आहे. कापूस काळवंडलेले आहे. धानाचे पीक जमीनदोस्त झालेले आहे. हातात येणारे पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. कर्जबाजारी होऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर कुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना संकटात आधीच बंदिस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहेत.
सुदर्शन निमकर,
माजी आमदार,राजुरा..
शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे .शेतमालाला भाव नाही. त्यातच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी खचला आहे. राजुरा क्षेत्रातील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी, शासनाने या भागातील नुकसानग्रस्त शेती यांचे तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
काल रात्री झालेल्या पावसामुळे व वादळामुळे वरुर, टेंबरवाई, तुलाना, बेरडी, चीजबोडी इ. परिसरातील धान पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर गोवरी, पवनी, माथरा ,सास्ती ,कडोली , मार्डा, पेलोरा इतर भागामध्ये प्रचंड प्रमाणात कापसाचे व सोयाबीनचे नुकसान झाले आहे.