राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व दक्षिण - पश्चिम विभागीय अध्यक्ष प्रा. देविदास घोडे यांच्या आकस्मिक निधनाने पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. प्रा. देविदास घोडे हे अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने पक्ष एका कार्यशैलीला आणि प्रामाणिकपणाला कायम मुकला आहे, असे भावपूर्ण उद्गार प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी काढले. प्रा. देविदास घोडे यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. मा. अनिलजी अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत माजी आमदार दीनानाथ पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. रामकृष्णनगर येथे झालेल्या या शोकसभेत दक्षिण - पश्चिम विभागाचे बजरंगसिंह परिहार, मधुकर भावसार, तात्यासाहेब मते, महादेवराव फुके, जानबा मस्के, अलका कांबळे, विक्रांत तांबे, शैलेश तिवारी, संजय शेवाळे, रवींद्रसिंह मुल्ला, भैयालाल ठाकूर, निशिकांत काशीकर, मुन्ना तिवारी अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावपूर्ण शोकसंवेदना व्यक्त केल्या. या प्रसंगी गृहमंत्री मा. ना. अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग ह्यांनी पत्राद्वारे आपली भावपूर्ण आसवांजली पाठविली.
कार्यक्रमाला मच्छिंद्र आवळे, विजय मसराम, देवानंद रडके, बबलू चौहान, अरविंद ढेंगरे, भाईजी मोहोड, संग्राम पनकुले, वसंत घटाटे, प्रल्हाद वारवेकर, प्रमोद जोंधळे, विलास पोटफोडे, पद्माकर सावळकर, सोपानराव शिरसाट, सूरज बोरकर, चेतन मस्के, चंद्रभान कवाडे, राहुल दळवी, रमेश नरांजे, सुशांत मून, नायडू, रेवतकर ह्यांनी पुष्पहार घालून हृद्य श्रद्धांजली अर्पण केली.