▪️सामान्य जनतेची लूट थांबविणे
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी): जिल्हयात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील सोळा खासगी दवाखाने अधिग्रहित केले आहे. मात्र, या रूग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. रविवारी विश्रामगृहात तातडीने बैठक घेत लूट थांबविण्याचे निर्देश दिले. एक दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या होत्या. खासदारांच्या सूचनेप्रमाणे मनपा आयुक्तांनी विविध महत्वाचे उपायोजना आणि कारवाई त्यांनी केली आहे. त्यासोबतच खासगी अँटिझन चाचणी केंद्रात केलेल्या चाचणीच्या अहवाल अनेकदा पॉझिटिव्ह येत असतो. तर त्याच व्यक्तीनी शासकीय रुग्णालयात केलेली चाचणी हि अनेकदा निगेटिव्ह येत आहे. हि सामान्य जनतेची लूट होत असल्याने हे खासगी अँटिझन चाचणी केंद्र बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.या बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहीते, जिल्हाध्यक्ष ओबीसी कमेटी उमाकांत धांडे, प्रवीण पडवेकर, गोपाळ अमृतकर, एन. एस. यू. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ज्येष्ठ नेते विनोद दत्रात्रय, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, मनपाचे वैदकीय अधिकारी अविष्कार खंडारे यांची उपस्थिती होत. जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर पोहोचली आहे. आतापयेत आठ हजार चारशे छतीस रूग्ण बरे झाले तर तीन हजार एकशे अठेचाळीस रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंदपूर शहरातील सोळा रुग्णालय अधिग्रहित करण्यात आली आहेत. येथे अनेकजण उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्यांची परिस्थिती बेताचीच आहे. मात्र जीव वाचविण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे. या परिस्थितीत रूग्णांची खासगी रूग्णालयांतून लूट सुरु आहे. हि लूट थांविण्याकरिता या खासगी रुग्णालयासमोर शासनाच्या दिशानिर्देशा प्रमाणे आकारण्यात येणाऱ्या दाराचे फलक त्याच सोबत सिटीकॅन केंद्रावर देखील शासकीय दराचे फलक लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना केल्यात. खासदार बाळू धानोरकर यांनी सूचना केल्याप्रमाणे महानगर पालिका आयुक्तांनी पथके निर्माण केली. पीपीई किटची किमत पाचशे रूपये आहे. मात्र बाराशे ते पंधराशे रूपये या किटसाठी खासगी रूग्णालयातून घेतले जात आहे. कोरोनाबाधितांच्या रक्त तपासण्या करण्यात येतात. त्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहे. अशीच लूट रूग्णवाहिकाधारक करीत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशा प्रमाणे आकारण्यात येणाऱ्या दिशानिर्देशनेत पीपीई किटच्या समावेश करावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्राद्वारे केली आहे.