परितक्त्या महिलेला गैरवर्तन व संजय गांधी निराधार योजनेपासून आदिवासी महिलेला वंचित ठेवले
राजुरा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर एकदिवसीय कार्यशाळा घेण्याची मागणी
राजुरा नगरपरिषदेच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर होणार धरणे आंदोलन
राजुरा/ प्रतिनिधी
संजयगांधी निराधार योजनेतील परिपत्रकात परितक्त्या महिलांना लाभ देण्याची तरतूद असताना सौ. सुमन वसंता सोयाम या आदिवासी महिलेला राजुरा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
नगरपरिषदेचे कक्ष अधिकारी हे अर्वाच भाषेत बोलून परितक्त्या महिला असलेल्या प्रमाणपत्रावर कर निरीक्षक यांची सही होऊ देत नसून ती मागील दोन महिन्यांपासून नगरपरिषदेच्या चकरा मारत आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील तरतुदी प्रमाणे शहरी भागातील परितक्त्या महिला असलेल्या महिलांना नगरपरिषदेचे करनिरिक्षक व तलाठी यांची संयुक्त सही प्रमाणपत्रावर आवश्यक असते मात्र राजुरा नगरपरिषदेचे कक्ष अधिकारी जांभूळकर यांना या कायद्याचे ज्ञान नसल्याने सौ. सुमन सोयाम या आदिवासी महिलेला लाभा पासून वंचित राहावे लागत आहे.
जांभूळकर यांच्या अभद्र वागणुकीमुळे व अर्वाच्य भाषेत सुमंन सोयाम यांचे सोबत बोलल्यामुळे सदर महिला घाबरून गेली आहे. याची गंभीरतेने दखल घेत आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक संतोष कुडमेथे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून जांभुळकर यांचेवर कडक कार्यवाही करावी. तसेच राजुरा नगर परिषदेच्या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा घ्यावी जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेतील तरतुदीप्रमाणे कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसेच सौ. सुमन वसंत सोयाम यांचे परितक्त्या असलेल्या प्रमाणपत्रावर राजुरा नगरपरिषदेचे कर निरीक्षक यांनी सही करावी असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदनातील
मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक १४/१०/२०२० रोज बुधवारला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संतोष कुळमेथे यांनी राजुरा तहसीलदार यांना दिले आहे.
राजुरा नगर परिषदेतील कर्मचारी अनेक लोकांसोबत अर्वाच्य भाषेत बोलतात असे अनेकांचे मत आहेत यावरून तेथील मुख्याधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राजुरा शहरात परितक्त्या महिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अश्या वर्तणुकीमुळे व त्यांच्या अज्ञानामुळे कित्येक महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नसतील हे यावरून लक्षात येत आहे असेही संतोष कुळमेथे यांनी म्हटले आहे.