राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शेवटचे दर्शन !
११ आक्टोंबर १९६८ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा निर्वाण दिवस. माझ मराठी चवथ्या वर्गाच शीक्षण गुरूकुंज आश्रम येथे श्रीगुरूदेव विद्यामंदीर प्रार्थमीक शाळेत झाले. गुरूकुंज आश्रमातील मानवसेवा छात्रालयात. पाचवी पासुन प्रवेश मीळतो. पण राष्ट्रसंतांच्या आश्रमात माझी मुल शीकावीत अशी प्रबळ इच्छा माझे बाबा दुर्गादासजी रक्षक यांची होती. राष्ट्रसंतांच्या आदेशाने मला आणि माझे मोठे भाऊ घनशामराव रक्षक यांना मानवसेवा छात्रालयात प्रवेश मीळाला ते वर्ष १९६८ होते. १९६७ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरच्या शासकीय मेडीकल रूग्नालयात शारीरीक तपासनीसाठी खुप दिवस होते. पेइंग वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमच राहण जवळच असल्यामुळे रोज सायंकाळच्या सामुदायीक प्रार्थनेला उपस्थीत राहण्याच भाग्य मला मीळाले. राष्ट्रसंतांचे गावोगावचे दौरे त्यांच्या शेवटच्या काळात खुप वाढले होते. प्रकृतीची तमा न बाळगता त्यांच लोकप्रबोधन सुरू होत. १९६८ च्या आषाढी एकादशीला पंढरपुरच्या यात्रेत पोटतीडकीने राष्ट्रसंतांनी भजने गायली. प्रबोधन करतांना आपला जीवनपट थोडक्यात उलगडत जनसागरातील पांडुरंगाला उद्येशून "पांडुरंगा आता शरीर साथ देत नाही. जमेल तेवढी लोक सेवा मी माझ्या परीने केली. आता ही खंजरी तुझ्या चरणाजवळ ठेवतो. " शेवटचे भजन म्हटले-
"भगवान मुझे मरना दे, नही देख सखु दीन जादे ।
भारत के इस दैना को, या फीर तो दुःख मिटा दे ॥ "
राष्ट्रसंत मुंबईला, बाम्बे रूग्नालयात भरती झाले. तेथील उपचारात कर्करोगाचे निदान झाले. राष्ट्रसंतांच्या इच्छेतून परत गुरूकुंज आश्रमात मुक्कामाला आले. मानवसेवा छात्रालयासमोर "ध्यान योग मंदिरात " राष्ट्रसंतांचा मुक्काम होता. राष्ट्रसंतांचे स्नेही महान तपस्वी राष्ट्रसंतांच्या वयापेक्षा कितीतरी मोठे असे स्वामी सितारामदास महाराज (मंडला ) हे गुरूकुंज आश्रमातच मुक्कामाला होते. ते राष्ट्रसंतांना म्हणायचे " आप मेंरे भगवान हों, मेंरे राम हो " तासन-तास राष्ट्रसंतांच्या रूग्न शैय्येजवळ बसुन आध्यात्मीक चर्चा करायचे. एक दिवस राष्ट्रसंत स्वामीजींना म्हणाले "स्वामीजी यह शरीररूपी कपडा बहुत जीर्ण होगया है मैं इन्हें बदलांना चाहता हूँ, फीर और मीलेंगे " स्वामीजी एकदम चिंताचूर झाले." नही राम मेरे भगवान आप जां नही सकते." स्वामीजींनी आपली ध्यान साधना सुरू केली. सारे गुरूदेव सेवक, भेटायला आलेली थोर मंडळी या दोन्ही मीत्रांच मीत्र प्रेम पाहात होते. काही वेळाने स्वामीजींनी डोळे उघडले. राष्ट्रसंतांना म्हणाले, "राम जो मुझे पाने के लिए कही समय गवांना पडा कम संमयमें आपने सब पालीयां. मैं आपके ही पीछें ही जीवन का प्रस्थान करूंगां. " या दोन्ही महापुरूषांच्या डोळ्यात पाणि होते. अस्वस्थ मणाने स्वामीजी आपल्या कुटीत आले. त्यांच्या सेवेत असलेले नागपूरचे यशवंतराव लांजेवार यांनी स्वामीजींना विचारले,"स्वामीजीं क्या बात है आप अस्वस्थ दीख रहें. " स्वामीजीं म्हणाले, " यशवंत मेरा राम अभी नही बचेंगा. ही घटना यशवंतराव लांजेवारांनी मला सांगीतली." मृत्युला डोळ्यासमोर ठेऊन त्याही परीस्थीतीत राष्ट्र जागृतीचे मानव कल्यानाचे काम करीत होते.१९६८ मध्ये उन्हाळ्याचे दिवसात नागपूरात हिंदु -मुस्लीम दंगल उसळली. त्यात मनुष्य हानी, घरांची जाळपोळ हे ऐकून राष्ट्रसंत अस्वस्थ झाले. त्यांनी नागपूरचे नीस्वार्थ समाजसेवी रतनचंदजी डागा यांना सर्व धर्म गुरूंना आणून गुरूकुंजात सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करायला सांगीतले. त्यात विवीध धर्माचे धर्मगुरू उपस्थीत होते. ध्यानयोग मंदिराच्या समोरच्या लहानशा पंटागनात ही प्रार्थनासभा आयोजीत होती. राष्ट्रसंतांना सारख्या उचक्या त्या दीवशी शुरू होत्या. राष्ट्रसंतांना सर्वधर्मीय प्रार्थना सभेत जाण्यास डॉक्टर आणि गुरूदेव सेवक मना करीत होते. नाका तोंडात नळ्या लागल्यामुळे बोलतांना राष्ट्रसंतांना त्रास होत होता. रतनचंदजी डागा गरजले, "महाराजजीकी इच्छा है तो महाराजजी प्रार्थना सभा में आयेंगे. मेरा महाराज प्रार्थना करते मरगया तो चलेंगा." डागाजींचा रूद्र अवताराने सारे घाबरले. व्हील चेअरवर बसवुन डागाजींनी राष्ट्रसंतांना प्रार्थना सभेत आणलं. सर्वधर्मीय प्रार्थना धर्मगुरूंनी म्हटल्या. राष्ट्रसंतांनी माईक जवळ बोलावला आणि अस्सल हिंदीत विस मिनिट त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, " बकरी और शेर दोनों में प्यार हो जाए, उनमें स्नेह पैदा हो जाये तो वे प्राणी होकर भी एक जगह रह सकते हैं. हम तो इंसान है ! हम धर्म के नाम पर आपस में क्यों लढते है ? अपना धर्म, अपनी देवी-देवता अपने घर तक सीमीत रखना चाहीए. बाहर हम राष्ट्रधर्म के है, हमारा भारत देश कैसा सुजलाम् -सुफलाम् बनायेंगे यह सोचो." पूर्ण भाषणात उचक्या बंद होत्या. ह्या भाषणाचा आडीओ उपलब्ध आहे. या सर्व प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. डागाजींकड़न हा प्रसंग सर्वधर्म प्रार्थना सभेत अनेकदा ऐकला आहे. ११ आक्टोंबर शाळेतून काही कारणासाठी मी गुरूदेव नगरात आलो होतो. लोक आश्रमाकडे सुसाटात धावतांना दिसत होते. मनात पाल चुकचुकली राष्ट्रसंतांना आम्ही बावाजी म्हणत होतो. "बावाजीले काही झाल तर नाही "शाळेत धावत गेलो. वच्छलाबाई वाघ आमच्या शीक्षीकां. सांगायच कस मी अस्वस्थ होतो. माझ्या बोलण्यावर कोन वीश्वास ठेवनार ? राठी सरपंचाच्या मुलाने येऊन राष्ट्रसंतांच्या नीर्वानाची वार्ता दीली. आम्ही सुसाट सुटलो आश्रमकडे. दप्तर फेकली छात्रालयात, तुफाण गर्दीत आम्ही लहान मुल सहभागी झालो. लोक आया-बहीनी धाय मोकुन रडत होते. गुरूकुंज आश्रमातील प्रसन्नताच कोमेजली होती. राष्ट्रसंतांचा देह लोकदर्शनासाठी प्रार्थना मंदिरासमोर ठेवलेला. त्या रात्री कितीदा तरी राष्ट्रसंतांच्या देहाचे आम्ही दर्शन घेतले. तो महापुरूष माझ्या इवल्याश्या डोळ्यात समावन्याचा मी प्रयत्न केला. जेवन न करता रात्री केव्हा झोपी गेलो कळल नाही. सकाळी कळल गुरूकुंजाच्या महाद्वाराजवळ एकाने वीष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अंत्ययात्रेत मी सहभागी होतो. १२ आक्टोंबरला राष्ट्रसंतांची निर्वान यात्रा नीघाली. राष्ट्रसंतांची आंघोळ स्वामी सीतारामदांस महाराजांनी घातली. फुलांच्या हारांनी सुशोभीत ट्रकवर राष्ट्रसंत प्रसन्न मुद्रेने चिरनीद्रा घेत होते. ही यात्रा दासटेकडीवर राष्ट्रसंतांच्या स्वप्णातल्या विश्व-मानव मंदिराच्या दर्शनासाठी नेली. गुरूकुं आश्रमच्या परीसरातीलच नाही तर पन्नास कोसावर दुकाने हॉटेल पुर्नता बंद होते. भुकेल्या पोटांना शेतातील भुईमुंगाच्या शेंगानी आसरा दीला. पुन्हा लाखोचा जनसमुदाय निर्वाण यात्रेत सहभागी होता. ही यात्रा गुरूकुंज आश्रमात परत आली. राष्ट्रसंतांनी मृत्युपत्रात लिहल्या प्रमाणे, " प्रार्थना मंदीरातला दिवा मला तेवत दिसावा. अशा ठीकाणी मला अग्नी द्या." रात्रीलाच श्रीगुरूदेव विद्या मंदिराच्या पटांगणाच्या बाजुच्या शेतमालकाला शेतमालासहीत जमीनीची किंमत देऊन ती ताब्यात घेतली. हजारो हाथानी बाभळीचे झाड, ज्वारीचे कणस, तोडण्याचे काम केले. आमच्या इवल्या हाथाने आम्ही भुईमुंग उपडला. आमचा कुंटुब प्रमुख राष्ट्रसंत एका मातीच्या ओट्यावर अग्नीत विलीन झाला. राष्ट्रसंतांच्या इच्छेप्रमाणे अग्नीसंस्कार, अंतीम संस्कार स्वामी सीतारामदास महाराजांनी केले. आम्ही लहान गर्दी महान, त्या गर्दीत फक्त अग्नीच्या ज्वाळाच आम्हाला दिसत होत्या. आम्ही हाथ जोडून कुंटुंब प्रमुखाला नतमसतक होत होतो. नंतर जेव्हा राष्ट्रसंतांच्या अंतीम इच्छा वाचण्यात आल्या "माझ्या मृत्यूनंतर मंदिर बांधु नका. फक्त एक ओटा सभोवताल बेल, पींपळ, औदुंबर, वड आणि आवळा हे पंच वृक्ष लावा. पुजा, आरती, कर्मकांड याच स्तोम माझ्या समाधीवर माजवु नका. '' हे सार राष्ट्रसंत बोलत असायचे. त्यांनी मृत्युपत्रात ते लेखी लीहुन ठेवले आहे. आम्ही ते किती समजून घेतो. विश्वशांतीसाठी , मानवकल्यानासाठी, देशहितासाठी ह्या मानवाने अहोरात्र प्रयत्न केले. अवघ्या ५९ व्या वर्षी आपली जीवनयात्रा श्रीगुरूदेव चरणी समर्पीत केली.
आपण गुरूदेव सेवक म्हणून व्यक्तीपूजक आहोत की विचारपुजक याच चिंतन करा !जयगुरू !
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी
विचारधारा !
........
©️फेसबूकवरून साभार