गारेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे मध्य चांदा विभागात जेरबंद केलेला आर टी १ वाघ आणल्याने हाउसफुल्ल झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात जेरबंद केलेल्या बाघिणीला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिंट ट्रोटमेंट सेंटरमध्ये हलवल्याने या आक्रमक वाघाला जागा मिळाली.
या स्थितीत राज्यातील इतर वन क्षेत्रातान वाघाला रेस्क्यू केल्यास त्याला कुठे हलवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टिपेश्वर येथून आणलेल्या वाघिणीला समितीने दिलेल्या निर्णयानुसार निसर्ग
मुक्त करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा लागणार असल्याची चर्चा आहे.
मध्य चांदा वन विभागातील राजूरा विसर वन परिक्षेत्राअंतर्गत मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या
आर टी १ या वाघास मंगळवारी जेरबंद केले. त्या वाघाला गोरेवाडा बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. वाघ अतिशय आक्रमक असून त्याला रुग्णालयातील पिंजऱ्यात पशू चिकित्सकांच्या देखरेखोखाली चिकित्सालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आठे आहे. डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. शालिनी एस, मयूर पावशे , यांनी वाघाची तपासणी केली.
वाघाच्या शरीरावर विशेषतः चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्याच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहेत. हा वाघ अतिशय आक्रमक असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेलाआहे.
गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये बिबट्यांसाठी २०, अस्वलींसाठी ५ आणि वाघांसाठी १० पिंजरे आहेत. गोरेवाडामध्ये आता दहा बाघ झाले असले तरी एक वाघ ट्रांझीस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आलेले आहे.त्यामुळे या वाघासाठी जागा उपलब्ध झाली.