गुंडाराज वर लावणार ब्रेक
नवनियुक्त पोलीस उपायुक्त नरूल हसन
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या परिसरात अवैद्य धंदयाला उत आला असुन वाडीत महीला असुरक्षित आहे . महामार्गाच्या कडेला वाहनाची पॉर्कीग करतात .परिसरात वाढलेली गुंडागर्दी ,सट्टा, बार,अवैध दारू विक्री महिलावर होणारे अत्याचार , महामार्गावरील ढाब्यावर पोलिसासमोर होणारी दारु विक्री या विषयावर शांतता कमिटीचे सदस्य,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता,नगरसेवक,महिला,राजकीय पक्षातील नागरीकांसोबत पोलीस उपायुक्त नरूल हसन यांनी गुरुवार २२ ऑक्टोंबर रोजी चर्चा केली . त्या चर्चा दरम्यान वाडी परिसरातील अवैद्य धंदयाचा लवकरच पर्दाफाश करणार असुन गुंडाराजवर ब्रेक लावणार आहे .नागरीकांनी अवैध धंद्याची माहीती दयावी त्यांचे नाव गुप्त ठेवल्या जाईल . अशी माहीती पोलीस उपायुक्त नरूल हसन यांनी दिली .
वाडीत सर्वात मोठी समस्या ट्रान्सपोर्ट व्यावसायीकांची आहे . चारचाकी वाहने उभे करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे वाहने रस्त्यावर उभी राहतात परिणामी पोलीस विभागाकडुन दंडही आकारण्यात येतो पार्कींगची समस्या सोडवा अशी मागणी ट्रान्सपोर्ट युनियनचे महेंद्र शर्मा यांनी केली .वाडी जवळील अमरावती महामार्गावरील ढाब्यावर पोलिसाची गाडी उभी राहून दारू खुलेआम विकल्या जात आहे . पीसी पासून सीपी पर्यंत याची माहिती राहते तरीही कारवाई होत नसल्याची तक्रार भाजपा वाडीचे अध्यक्ष तथा माजी सभापती केशव बांदरे यांनी केली . रस्त्याच्या मधोमध ऑटो उभे राहत असल्यामुळे नागरीकांना वाहने काढण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार माजी सभापती कैलाश मंथापूरवार यांनी केली .झुग्गी झोपड़ी एरिया मध्ये क्रिमिलन एक्टिविटी वाढली आहे . डॉ .आंबेडकर नगर मध्ये अवैध धंदे खुले आम सुरू आहे यावर अंकुश लावावा . अशी मागणी बसपाचे प्रणय मेश्राम यांनी केली . डॉ .आंबेडकर नगर मध्ये रात्री असामाजिक तत्वाचा त्रास होत असुन रात्री महीला असुरक्षीत असल्याचे भारीपचे राजेश जंगले यांनी सांगीतले . दवलामेटी येथील उषा चारभे यांनी परिसरात होत असलेल्या महीलावरील अत्याचाराचा पाढाच वाचला यावर अंकुश लावण्याची मागणी केली . यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक , लाव्हाच्या सरपंच ज्योत्सना नितनवरे, माजी जि. प . सदस्य सुजित नितनवरे , पोलिस अधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते .