Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

24 ऑक्‍टोबरला ओबीसी समाजातील महत्त्वाच्या नेत्यांची नागपुरात बैठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व संलग्णीत ओबीसी संघटनाच्या व जातीय संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की केंद्र व महाराष्ट्र शासन अनेक वर्षापासून 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजावर सतत अन्याय करीत असून समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेत नाही. संविधानाच्या कलम 340 नुसार जे अधिकार व सुविधा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे ते अजून पर्यंत केंद्र व पुरोगामी महाराष्ट्रात राज्य सरकाराने दिलेल्या नाहीत.

 या विरोधात आंदोलनाची भूमिका ठरविण्या बाबत राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध संघटना तसेच जातीय संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा  शनिवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च पावनभूमी सोमलवाडा वर्धा रोड नागपूर ( तायवाडे सरांच्या घराजवळ ) दुपारी १ वाजता आयोजित केलेली आहे, सभेच्या अध्यक्षस्थाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे राहतील.

सभेत महाराष्ट्र राज्यासी  संबंधित व केंद्र सरकारसी संबंधित मागण्यांवर विचार विनिमय करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.

महाराष्ट्र शासनासी संबंधित व केंद्र शासनासी संबंधित प्रश्न व मागण्या सोबत पाठवीत आहे याव्यतिरिक्त कुठल्या समस्या व प्रश्न समाविष्ट करावयाचे असल्यास सभेत नमूद करावे त्यांच्या समावेश करण्यात येईल.

सदर सभेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सलंगीत ओबीसी संघटनांचे व जातीय संघटनांच्या पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे सुचविण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.