Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०६, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी 3 जण दगावले

आतापर्यंत 7883 कोरोना मुक्त

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3246

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 11306

24 तासात 188 बाधित आले पुढे; तीन बाधितांचा मृत्यू




चंद्रपूर, दि. 6 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 306 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 883 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 246 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, खुटाळा, चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू घुटकाळा, चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू लक्ष्मी नगर, चंद्रपुर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 1 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 177 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 168, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 76, पोंभूर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 17, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील आठ, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 11, नागभीड तालुक्यातील 26, वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 9, सावली तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील आठ, गडचिरोली, गोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन असे एकूण 188 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील जलनगर वार्ड, ऊर्जानगर, बागला चौक परिसर, सिस्टर कॉलनी परिसर, रामनगर, मित्र नगर, बाबुपेठ, विठ्ठल मंदिर वार्ड, वाघोबा चौक तुकूम, दुर्गापुर , सिद्धार्थ नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील आंबेडकर वार्ड, फुलसिंग नाईक झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, टिळक वार्ड, बालाजी वार्ड, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती, जवाहर नगर, सोनिया गांधी चौक परिसर, रामनगर कॉलनी परिसर, भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील माढेळी, मालवीय वार्ड, आंबेडकर चौक परिसर, कॉलरी वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गाडगेबाबा नगर, विद्यानगर, कुर्झा, चिखलगाव, बाजार चौक परिसर, आक्सापुर, शारदा कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, गुरूनगर, कुणबी सोसायटी परिसरातून बाधित पुढे आले आहे.सावली तालुक्यातील अंतरगाव भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील नवखेडा, वाढोणा, शिंदे लेआउट परिसर, गिरगाव, डोंगरगाव, सावरगाव, नवखडा, किरमिटी मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील बंदर खडसंगी,भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर, लाल बहादुर स्कूल परिसर, कन्हाळगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.