Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २६, २०२०

समर्पित भावनेतून विद्यार्थ्यांशी नाते जोडा : प्राचार्य संभाजी वारकड




जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षकांचा सत्कार

राजुरा/ प्रतिनिधी
देशाला घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते. शिक्षकी पेशा हा एक व्रत आहे. आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने करताना शिक्षकांनी समर्पित भावनेतून विद्यार्थ्यांची नाते जोडावे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच सर्वात मोठे बक्षीस शिक्षकांसाठी असते. सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे असे आवाहन डॉक्टर प्राचार्य संभाजी वरकड यांनी राजूरा येथील कार्यक्रमात केले.
जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा वर्षभरामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य वारकड मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेसीआय राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुष्मा शुक्ला , प्रमुख पाहुणे , तसेच बक्षीस वितरक म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री सतीश यादवराव धोटे सर उपस्थित होते. हा कार्यक्रम विहीरगांव चे युवा उपसरपंच श्री इरशाद वाहीद शेख , जिल्हा परिषद् हाईस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री गजानन चौव्हान सर व स्वर्गीय श्यामा कृष्णदत्त शुक्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री के.जे.शुक्ला यांच्या सौजन्याने घेण्यात आला.
या कार्यक्रमात राजुरा तालुक्यातील विविध कलागुण संपन्न शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचे सत्कार स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.यात संदीप कोंडेकर , इरफान शेख, रामरतन चापले , मनीष मंगरूळकर, जाकीर अली सय्यद , आनंद चलाख, बाबा कोडापे, बादल बेले, संगीता मूलकलवार, कृतिका सोनटके,वैशाली विजय भोयर, चंद्रप्रकाश बुटले रूपा बोरेकर, तृप्ती विकास मेंडूलकर, नरेश रामराव बोभाटे माजी मुख्याध्यापक , जिल्हा परिषद हायस्कूल विहीरगाव, गणेश आबाजी लोहे मुख्याध्यापक, मेहमूद शेख उर्फ पाशा शेख सर नॅशनल ॲथलेटिक्स व स्पोर्ट्स ट्रेनर राजुरा , सुशीला सत्यनारायण पोरेड्डीवार होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सुशिला पुरेडडीवार यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगावचे शिक्षक श्री स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा बोढे ,सुशीला पुरेड्डीवार व इतर सदस्यांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.