आष्टी, ता. ६ : अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाअध्यक्षपदी अशोक खंडारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुलपती मेश्राम, राजन बोरकर उपस्थित होते. या बैठकीत अखील भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा कार्यकारिणी गठित करन्याचे ठरविण्यात आले सर्वानुमते अशोक खंडारे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच महासचिव हंसराज उंदिरवाडे, संघटक हेमंत सहारे, उपाध्यक्ष तैलेश बांबोळे, योगेश टेंभूर्णे, रमेश बारसागडे, कृष्णाजी चौधरी, आनंदराव जांभुळकर, सहसचिव प्रल्हाद रायपूरे, राजू वाकडे, पुंजाराम जांभुळकर, कोषाध्यक्ष अशोक खोब्रागडे आदिंची निवड करण्यात आली.
महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष निताताई सहारे, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, उपाध्यक्ष जिजाबाई सुखदेवे, स्मीता रायपूरे, तेजस्विनी रामटेके, अर्चना राऊत, गडचिरोली शहर अध्यक्ष वनमाला झाडे, शहर कोषाध्यक्ष माधूरी शंभरकर, आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष पुनेश्वर वड्डे, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपूरे, सरचिटणीस पुण्यवान सोरते, गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल बारसागडे यांची सुद्धा निवड करण्यात आली.
या वेळी नवनियूक्त अध्यक्ष अशोक खंडारे यांनी गडचिरोली जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करनार असे आस्वासीत केले.