Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

शिक्षण राज्यमंत्री यांची क्रीडा-कला विषयक बैठक होणार लक्षवेधी





राज्यातील कला व क्रीडा शिक्षकांना मिळेल न्याय!


ना. बच्चू कडू यांचे उपस्थितीत बैठक


तालुका प्रतिनिधी
काटोल : शिक्षण क्षेत्रात मागील काळात विविध स्थित्यंतरे घडत असताना अनेक चुकीचे शासन निर्णय झाले. या चुकीच्या निर्णयाला सर्वसामावेशक करण्याचा व न्याय देण्याचे काम विद्यमान सरकारमधील मंत्रीमहोदय, पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी वर्गाने काम सुरु केले आहे. याचाच एक भाग दिनांक 9 सप्टेंबरला शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू संघटनेच्या मागणीवरून कला-क्रीडा संबंधी शासकीय स्तरावर महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले असून ही बैठक महत्वपूर्ण ठरणार असल्याचे अध्यक्ष महा. राज्य शारीरिक व क्रीडा शिक्षण महासंघ राजेंद्र कोतकर यांनी सांगितले.
बैठकीला ना.बच्चू कडू , अप्पर सचिव, सचिव, शिक्षण संचालक, क्रीडा संचालक, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाधिकारी मुंबई यांच्या सोबत विविध प्रश्ना संदर्भात ही बैठक होत आहे . बैठकीत अर्क सजरात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा राज्यातील क्रीडा शिक्षकांचे वतीने करण्यात येत असल्याचे नागपूर संघटना प्रतिनिधी प्रीतम टेकाडे यांनी मत व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.