# अनोखा जन्मदिन सोहळा शेतात साजरा
# करोना संकटातून मुक्तीचे आव्हान
सुधीर बुटे
काटोल : महाराष्ट्र भूषण कीर्तन केशरी तथा रामयणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक सध्या करोना काळात जन्मगाव तालुक्यातील वंडली ग्राम येथे निवासी आहे. त्यांचा राज्यभर चाहते असल्याने दरवर्षी राज्यात मोठया शहरात भव्य प्रमाणात अभिष्टचिंतन सोहळा आयोजिल जातो. यावर्षी तालुक्यातील चाहते मंडळी यांना संधी आल्यामुळे जन्मदिन त्यांचे शेतात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शेत ग्राम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यांना करोना काळ सुरू असल्याने दूरध्वनी वरून शुभेच्छा देण्यात आल्या. काही मंडळींनी त्यांची भेट सुद्धा घेऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थानी शेतात कर्क कापून निराळ्या पद्धतीने अवस्मरनिय अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. यावेळी प्रतिक्रिया देतांना हभप रामराव महाराज ढोक म्हणाले करोना जागतिक महामारी असून या संकटातून सर्वाना मुक्ती मिळावी.जनतेनी शासनाचे दिशा निर्देशाचे पालन करण्याचे आव्हान याप्रसंगी केले.