मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
कुरखेडा,ता. ८ : शहरी व ग्रामीण भागातील किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-यांवर तसेच शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व उघड्यावर थुंकणा-यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचा ठराव दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम (मुक्तिपथ) तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नमिता बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी दामले, पोलीस निरीक्षक सुधाकर देढे, संवर्ग विकास अधिकारी कावरे, गटशिक्षणाधिकारी सी.एम.शिवणकर, कुकडे, वनविभागाचे देवरे, मुक्तीपथ तालुका प्रतिनिधी जितेंद्र कुनघाडकर उपस्थित होते. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असून यावर प्रतिबंध घालणे महत्वाचे आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम तालुका समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीवर नियंत्रण घालण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील गावागावामध्ये तंबाखूविक्री, थुंकणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन, नगर पंचायत, पंचायत समिती, आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्याचा ठराव घेण्यात आला. या पथकाच्या माध्यमातून तंबाखू विक्री, उघड्यावर थुंकणाऱ्यांवर व शासकीय कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.