आज दि.२५/९/२०२० ला मा.नामदार श्री राजेशजी टोपे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना सिध्दुजी कोमजवार यांच्या कडुन निवेदन देण्यात आले की रामटेके लोकसभेत ११ आरोग्य रुग्णालय आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या सर्व हाॅस्पीटल ला कोविड केअर सेंटर म्हणून सुरु केले तर ग्रामीण भागातील रुग्णांची भटकंती होणार नाही.
उपचाराअभावि हाल, हेळसांड होणार नाही व प्रशासनवर पडणारा ताण सुद्धा कमी होईल. तसेच करोडो खर्च करून बांधलेल्या इमारती अश्या कठिण प्रसंगी योग्य कामी येईल. तसेच जिल्ह्यातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे त्यामधे डॉक्टर, औषधी, सुविधा इत्यादींचा अभाव असल्यामूळे लोकांना फ़ार मनस्ताप होत आहे.
ग्रामीण क्षेत्रात उपचाराअभावी तेथील डॉक्टर शहरी भागात रेफेर करतात. शहरी भागातील खाजगी हॉस्पीटल मधे सरळ लूट मांडलेली आहे. रुग्णांना भरती करण्यापुर्वी रुपये 2 लाख जमा करयला लावतात त्या शिवाय रुग्णांना भरती केल्या जात नाहि. परंतू शासनाच्या नियमानुसार हे चुकीचे आहे याचाच अर्थ असा की, खाजगी हॉस्पीटल शासनाच्या नियमाचे उल्लंघन करित आहे. यामध्ये क्योर ईट, वंजारी, वोकहार्ट, सेवन स्टार, असे अनेक खाजगी दवाखाने आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. अश्या परीस्तीथीमध्ये ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांच्या नातलगांनी एवढा पैसा आणायचा कोठुन असा प्रश्न निर्मान झाला. ग्रामीण भागात च उपाययोजना केल्यास जो वेळ त्यांना ये जा करतांना लागतो तो वेळ वाचेल व त्या वेळेत त्यांचा जीव पण वाचेल.
त्यावेळेस प्रामूख्याने शिवसेनेतर्फे **सिध्दू कोमजवार, राजेश वाघमारे, आशिष देशमूख, हिमांशू ठाकरे, प्रविण देशमुख, अक्षय वाकडे, दिपक पोहनकर, कार्तिक नारनवरे , विनोद शाहू, सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभणे, मोहन शनेश्वर, अजय गायकवाड इतर शिवसैनिक** उपस्थित होते