गत तीन दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेन्ज, फॅमिल चॅलेन्ज, सिंगल चॅलेन्ज, खाकी चॅलेन्ज, डॉटर चॅलेज आदी 'हॅशटॅग' वापरून छायाचित्र अपलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे.
फेसबुकवरील 'कपल चॅलेन्ज' या 'हॅश टॅग'खाली दाम्पत्य धडाधड छायाचित्र अपलोड करीत आहेत.अनेक जण पत्नीसोबतचे विविध ठिकाणी काढलेले छायाचित्र कपल चॅलेन्ज , फॅमिली चॅलेन्ज या हॅशटॅग खाली फेसबुकवर अपलोड करीत आहेत. मात्र वेळीच सावध न झाल्यास सायबर गुन्हेगार या छायाचित्रांना मॉर्फ करुन आपली बनावट प्रोफाइल तयार करुन त्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र अपलोड करु शकतात.
त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेलही करु शकतात. वेळीच सवाध न झाल्यास आपल्याला हातात पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही.लातूर जिल्ह्यातील एका फेेेेसबूकधारकाला फोटो पोस्ट करणे महागात पडले आहे.
फेसबुकवर बायको ऐवजी चुकून मेहुनीसोबतचा फोटो कपल चॅलेंज मध्ये गेल्यामुळे बायकोने तक्रार नोंदवली. यात सख्ख्या बहिणीलासुध्दा नोटीस पाठवली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंग्यात ही घटना घडली.