Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर २५, २०२०

Covid 19 च्या रुग्णांइतकीच सामान्य रुग्णांचीही काळजी घ्यावी : NCP ची मागणी



कोवीड-१९ च्या रुग्णांकडे जेवढे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे तेवढेच लक्ष सामान्य रुग्णांकडेही द्यावे अशी मागणी प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केली. या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचेकडे रवीभवन येथे देऊन या मूलभूत मागणीच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात दारिद्रय रेषेखाली असलेल्या सामान्य रुग्णांकडे व डिलीव्हरी वार्डकडेही जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
मेडिकल, मेयो तसेच खासगी रुग्णालयांवर अंकूश लावणे आवश्यक असून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य व औषधी पुरवठा करण्यात यावा अशी विनंती दिलीप पनकुले यांनी केली.


कोवीड-१९ च्या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या इसमांचे व महिलांचे सोने व मंगळसूत्र गायब होत असून ते नातेवाईकांना मिळत नाहीत. त्यांच्यावर परस्परच अत्यसंस्कार केले जात आहेत. तसेच मृतदेहांची अदलाबदल होण्याच्या घटनाही घडत असल्याचे ना. राजेश टोपे ह्यांच्या निदर्शनास आणून दिले. ह्या बाबत आपण गंभीर असून या अमानुष प्रकारांची चौकशी करण्यात येईल असा विश्वास ना. राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिला. या प्रसंगी सोपानराव शिरसाट व विक्रांत तांबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.