२२ व्यसनी रुग्णांवर उपचार व औषधोपचार
गडचिरोली ता. ५ : दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे गावपातळीवर व्यसन उपचार शिबीर घेतले जात आहेत. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे गवसंघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनीकचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २२ रुग्णांनी उपचार घेतला.
दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन उराडी येथील व्यसनींनी दारू सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ठराव घेऊन गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनीकचे आयोजन करण्यात आले . गावक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्लिनीकला भेट दिली. यावेळी २२ व्यसनी रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला.
यावेळी प्राजू गायकवाड यांनी दारूचे दुष्परिणाम सांगत रुग्णांना समुपदेशन केले. प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेतली. क्लिनीकचे नियोजन मुक्तिपथ तालुका चमू दीक्षा सातपुते यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्रामसेवक गायपायले, पोलिस पाटील भाष्कर वैरागडे, गाव संघटनेच्या अध्यक्षा आशा मरस्कोल्हे, सचिव दतात्रय क्षीरसागर यांनी सहकार्य केले.