चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून एक आठवडा लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा 29 ऑगस्टला पालकमंत्री ना. विजय वडडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात आले.
मात्र स्थानिक प्रशासनाने आता त्यावर तोड़गा म्हणून जनता कर्फ्यू लावन्याचा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यु पुढील आठवड्यापासून लागू शकण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा विचारविमर्श करून हा निर्णय घेतला जाणार असून या चर्चेसाठी प्रशासनात व लोकप्रतिनिधीमध्ये चर्चेसाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागू शकतो त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ४ सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू असणार आहे.