Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर २५, २०२०

खासगी सिटीस्कॅन मशीनमधून रुग्णांची लूट

 

- पॅकेज नाही, शासकीय नियमाने फी घ्या  - खासदार बाळू धानोरकर 


- खासगी रुग्णालयावर लक्ष ठेवण्याकरिता पथक स्थापन करा 
  मनपा आयुक्त, अधिष्ठाता, जिल्हा शल्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना 



चंद्रपूर शहरात तीन खासगी डॉक्टरांकडे सिटीस्कॅन मशीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्यामुळे या कोरोनाच्या संकटात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यासोबतच नागपूर व शेजारच्या जिल्ह्यातील सिटीस्कॅन मशीनच्या तुलनेत चंद्रपूर येथील या मशीन अद्यावत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे यांची चौकशी करण्याचे आदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.


चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात दररोज रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यांच्या उपचाराकरिता वाढीव आरोग्य व्यवस्था म्हणून १६ खासगी रुग्णालये प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. परंतु त्यामध्ये रुग्णांकडून पॅकेज सारखी लाखोंच्या घरात फी आकारात असल्याचे आरोप रुग्णांच्या नातेवाईक करीत आहेत. यावर अंकुश ठेवण्याकरिता पथक स्थापन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी मनपा आयुक्त, अधिष्ठाता, जिल्हा शल्य अधिकारी यांना दिल्या.
आज खासदार बाळू धानोरकर यांनी कोरोना विषयांच्या परिस्थितीचा चंद्रपूर शासकीय महाविद्यालय येथे आढावा घेतला यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गहलोत, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, अशोक मत्ते, प्रमोद मगरे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोविड रुग्णांकरिता शासकीय व खासगी रुग्णालयात २७०० च्या घरात बेडची व्यवस्था आहे. दिवसाला रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे बेड कमी पडत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोविड रुग्णांकरिता वाढीव बेडमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सीजन लावण्यात याव्या, त्याच प्रमाणे अन्य एक हजार बेड वाढविण्याच्या योजनेला गती देण्याच्या सूचना यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्यात. चंद्रपूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालय येथे एकून १८० बेडची व्यवस्था असून ११० ऑक्सीजन तर ५० अतिदक्षता बेड, ख्रिस्त हॉस्पिटल तुकूम येथे, एकूण ६० बेड पैकी १३ ऑक्सीजन व ७ अतिदक्षता, त्याच प्रमाणे डॉ. मानवटकर, स्वानंद हॉस्पिटल, डॉ. बुक्कावार, श्वेता हॉस्पिटल, डॉ. पंत हॉस्पिटल, डॉ. पोद्दार कोल सिटी हॉस्पिटल, डॉ आनंद बेडले, डॉ वासाडे, डॉ. मुरके, गुरुकृपा डॉ झाडे, डॉ नगराळे, डॉ मेहरा या ठिकाणी देखील ऑक्सीजन, अतिदक्षता बेड सुसज्ज आहेत. या रुग्णालया समोर उपलब्ध बेड, व राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे आकारण्यात येणारी फी याचे फलक लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना केल्यात. त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्हयात प्रत्येक तालुका स्तरावर राजुरा, वरोरा, ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही, नागभीड, व इतर ठिकाणी देखील आयसोलेशन, ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकंदर ऑक्सीजन तथा अतिदक्षता ११९ त्यात ७८ व्हेन्टिलेटर्स व ६०९ सामान्य रुग्णांसाठी तसेच गंभीर नसलेल्या पॉझीटीव्ह रुग्णांसाठी २१०० च्या बेडची व्यवस्था असून महिला रुग्णालयात ४५० सैनिक शाळेत ४०० तर वरोरा ५०, ब्राम्हपुरी ५०, पोंभुर्णा ५० याप्रमाणे १००० बेडची व्यवस्था लवकरच होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यायलात उपलब्ध १२१ वैदयकिय अधिकाऱ्याच्या कोविड रुग्णांकरिता प्रभावीपणे व सुनियोजित पद्धतीने वापर करणे, वाढीव बेड मध्ये जास्तीत जास्त ऑक्सीजन व अतिदक्षता बेड करणे इत्यादि सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यात. जनता कर्फ्यूदरम्यान पोलीस विभागामार्फत अत्यावश्यक कामाने निघणाऱ्या नागरिकांवर वाहनाची कागदपत्रे तपासणी चा जो छळ सुरु आहे. तो त्वरित थांबवावा अशा सूचनाही खासदार बाळू धानोरकर यांनी पोलीस विभागाला दिल्या.

कोविड रुग्णालयाला खासदारांची भेट 
चंद्रपूर शासकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाला खासदार बाळू धानोरकर यांनी भेट दिली. त्यामध्ये  , अधिष्ठाता डॉ मोरे, जिल्हा शल्य अधिकारी डॉ राठोड यांना सूचना देत रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता स्वतः लक्ष देऊन रुग्णांना योग्य उपचार करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. 

महिला रुग्णालयातील ४५० बेडच्या कोविड रुग्णालयाची पाहणी 
खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतः आज महिला रुग्णालयातील ४५० बेडच्या कोविड रुग्णालयाची पाहणी केली. त्यासोबतच अन्य ठिकाणी देखील उभ्या होत असलेल्या अशा रुग्णालयाची उभारण्याकरिता लागणार वेळ कमी करून रुग्णांच्या सेवेत त्वरित हे रुग्णालय येण्याकरता कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.