मानवसेवा विकास फाउंडेशन (NGO )
साप्ताहिक ग्रामवैभव (NGO)
इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लीकेशन (महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था )तर्फे 2020 चा महाराष्ट्ररत्न मानवसेवा पुरस्कार किशोर बळीराम चलाख यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 11 वे अखिल भारतीय प्रतिभा संम्मेलनात देण्यात येणार होते.परंतू आता देशावर कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे हा समारंभ न करता हा पुरस्कार घरपोच पाठविण्यात येणार आहे. किशोर चलाख यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानवसेवा विकास फाउंडेशन (NGO )
साप्ताहिक ग्रामवैभव (NGO)
इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लीकेशन तर्फे यावर्षीच्या महाराष्ट्ररत्न मानवसेवा पुरस्कारासाठी किशोर चलाख यांची निवड करण्यात आली आहे. किशोर चलाख हे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक ग्राफिक्सकार,परीक्षक म्हणून प्रसिद्ध आहे.सोबतच उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्य करत आहे. काव्यप्रेमी शिक्षक मंच (रजि) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तसेच अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (रजि)गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मासिक दिवाळी अंक, साप्ताहिक वर्तमानपत्र यामध्ये त्यांचे अनेक लेख व कविता प्रकाशित झालेले आहे. दैनिक रयतेचा वाली शैक्षणिक डिजिटल दैनिकामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करत आहे.त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आकर्षक सन्मानचिन्ह, अभिलेख स्वरूप मानपत्र, महापुरुषांचे जीवनचरित्रपर पुस्तक, शाल श्रीफळ,स्मरणिका (विशेषांक )पुरस्काराचे स्वरूप असुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.