गडचिरोली, ता. २९ : येथील फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कअंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग' या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार आयोजि त करण्यात आले . यावेळी वेबिनारचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . एस . के . खंगार होते . तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर जिल्ह्यातील औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एम. एम. बेटकर होते . प्राचार्य डॉ . एस . के . खंगार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की , आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांनी नविन विषयावर संशोधन , पेटंट तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे . जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासासाठी फायदेशिर ठरेल . प्रमुख वक्ते डॉ . एम.एम. बेटकर यांनी बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व सहभागींच्या शंकाचे निराकरण केले . आयोजक व संयोजक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा . विनोद एम . कुकडे , आयोजक व संयोजक प्रा . डॉ . किशोर बी. कुडे तसेच आयोजन समितीचे इतर सदस्य प्रा . वाय . आर . गहाणे, प्रा . कु . पी. एस. वनमाली , प्रा . डॉ . ए . एस . लाकडे यांनी वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले . तसेच वेबिनारच्या यशासाठी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय कर्मचारी यांनी सहकार्य केले . या वेबिनारमध्ये 219 सहभागी उपस्थित होते . प्रा . विनोद कुकडे यांनी वेबिनारचे संचालन केले. तर डॉ . किशोर बी . कुडे, प्रा. यादवराव आर. गहाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, ऑगस्ट २९, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
नक्षलग्रस्त असरअलीच्या ZP शिक्षकास राष्ट्रीय पुरस्कार गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्ह
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्
श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वार्षिक महोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी - गडचिरोली वासियांनी घेतला लाभ गडचिरोली (प्रतिनिधी )- व्यसनमुक्तीचा विचार प
गडचिरोलीत डिजिटल मीडिया परिषदेची कार्यकारणी गठीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे डिजिटल मीडिया
गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह आज 497 नवीन कोरोना बाधित तर 283 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.23: आज जिल्हयात 497 नवीन
Maharashtra Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरे समृद्धी महामार्ग&
- Blog Comments
- Facebook Comments