राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे
५ ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार आहेत.
दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स सुरू राहतील. मात्र मॉल्समधील थिएटर आणि फूड मॉल तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंदच राहणार आहेत.
शासकीय कार्यालयांत १५ टक्के व १५ कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य राहील.
मेट्रो रेल्वे, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, सभागृहे पूर्वीप्रमाणेच बंद राहतील
रेस्टॉरन्ट सुरू करण्याची परवानगी नाही ,मात्र होम डिलिव्हरीची परवानगी मिळणार आहे
नवीन नियमानुसार रिक्षा मध्ये ड्रायव्हर +२ जणांना परवानगी असेल तर चार चाकीमध्ये ड्रायव्हर + ३ जणांना परवानगी असेल.
खुल्या मैदानातील खेळ खेळण्यास ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ५ ऑगस्टपासून जिम उघडण्यास परवानगी दिली मात्र राज्यामध्ये जिमवर बंदी कायम आहे
नियमाने आतापर्यंत दुचाकीवर एकालाच परवानगी होती, आता ५ ऑगस्टपासून दोन जण प्रवास करू शकतील
🪀