चंद्रपूर/ प्रतिनिधी
कोरोना आणि लाॅकङाऊनमुळे यंदाचे चे शैक्षणिक सत्र अद्यापही सुरू होऊ शकले नाही त्यामुळे अनेक शाळा आणि कॉन्व्हेंट ऑनलाइन शिक्षणावर भर देत आहेत.
त्यामुळे दिवसभर ऑनलाइन आणि अभ्यासात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी घरगुती चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हा उपक्रम समाधी वार्डातील बाविस चौकात घेण्यात आला.
सर्वत्र लाॅकङाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर जाता येत नाही बाग-बगीचे आणि क्रीडांगण बंद असल्याने खेळापासून वंचित राहावे लागत आहे. अशा वातावरणात मानसिक उत्साह वाढविण्यासाठी काव्यशिल्पच्या वतीने सामाजिक अंतर राखून घरगुती चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यात आस्था, आर्या, संग्राम, अर्पिता, देव्यांशी, स्मित, आरव आदी विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. चित्रकला स्पर्धेनंतर या विद्यार्थ्यांना चेह-यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. या स्पर्धेचे नियोजन शिल्पा झाङे- गंङाटे यांनी केले.