गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहेत.
वैनगंगेला गेल्या शंभर वर्षांत जेवढे महापुर आले नाहीत तेव्हढे महापुर या वर्षात आता आले आहे. वैनगंगेच्या नदी तीरावर वसले एक गाव भान्सी ता. सावली. जि. चंद्रपूर हया गावाला पुराच्या पाण्यानी वेढलेले आहे. शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास महापुराने हिरावुन घेतला आहे. तरी तलाठी साचा क्र. 16कापशी, मा. तहसीलदार सावली, मा. कृषी अधिकारी सावली यांनी, भान्सी, चक वढोली, वढोली चक, ऊपरी चक ईत्यादी गावाचे त्वरीत सर्व्हे करुन, शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य सहकार्य करा, असे पुरपिडीत शेतकऱ्यांची शासकीय यंत्रणेला कळकळीची विनंती आहे. गोसीखुर्द आणि ईतर वरील धरणाचे दरवाजे बंद करा, आणि वैनगंगेच्या काठावरील खालच्या गावाला वाचवा वैनगंगेच्या काठावरील जनतेची मागणी आहे.
गोसीखुर्द धरणात पाण्याचा साठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी वैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. लाडज गावातून 72 तर बेलगांव येथून जवळपास 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य बोटीद्वारे बचाव पथक सतत करीत आहे.
बचाव कार्य करण्यासाठी पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागविले होते. उद्या देखील हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यात येणार आहे.
सावली तालुक्यातील बेलगाव, निमगाव आदी गावांत पुराचा फटका बसला आहे. तसेच पोंभूर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी परिसरात असणारे गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.