Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १९, २०२०

चंद्रपूर:24 तासात 30 कोरोनाचे बाधित आले पुढे

Corona Coronavirus Hand - Free image on Pixabay
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 816 बाधित कोरोना मुक्त
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1195
उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 368
चंद्रपूर(खबरबात):
 चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 816 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1195 झाली आहे. गेल्या 24 तासात 30 बाधित पुढे आलेले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 368 झाली आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉन येथे जावे तसेच तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वतः नोंदणी व आरोग्य तपासणी करून संस्थात्मक अलगीकरणात रहावे. स्वतः आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण महत्वाचे आहे. संस्थात्मक अलगीकरणात आरोग्यविषयक सर्व सुविधा व काळजी घेण्यात येत आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 13 बाधितांचा समावेश आहे. यामध्ये एसीडब्ल्यू कॉलनी परिसरातील, बोरकर नगर परिसरातील, भानग्राम वार्ड, मल्हारी बाबा सोसायटी परिसरातील, बालाजी वार्ड नंबर 2, चव्हाण कॉलनी परिसरातील, पंचशील चौक, बाबुपेठ परिसरातील बाधित पुढे आले आहेत.
राजुरा येथील दोन बाधीत ठरले आहेत. कोरपना तालुक्यातील व चिमूर तालुक्यातील प्रत्येकी दोन बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील शास्त्रीनगर व राहुल नगर परिसरातील प्रत्येकी एक बाधीत पुढे आलेले आहेत.
बल्लारपूर येथील एका बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ब्रह्मपुरी विद्या नगर येथील एक तर तालुक्यातील वायगाव येथील दोन बाधित ठरले आहेत. नागभीड येथील एक तर तालुक्यातील कन्नाळ गाव येथील तीन व चिखलगाव येथील एक असे एकूण पाच बाधित पुढे आलेले आहेत.
जिल्ह्यात 20 हजार 765 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 290 पॉझिटिव्ह असून 20 हजार 475 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 606 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 115 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 663 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजार 195 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 25 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 94 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 686 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 291 बाधित, 61 वर्षावरील 69 बाधित आहेत. तसेच 1 हजार 195 बाधितांपैकी 823 पुरुष तर 372 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील
 कोरोना बाधितांची संख्या
1 हजार 195 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1081 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 62 आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.