चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी तर्फे निषेध
काँग्रेसचे शहर अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा इशारा
चंद्रपूर : कोरोना मोठ्या प्रमाणात थैमान मांडत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परीस्थितीत केंद्र सरकारने जेईईची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने परीक्षा पुढे ढकलाव्या अन्यथा काँग्रेस कडून येत्या काळात याला जनआंदोलन करू असा इशारा द्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालयांना टाळे लागलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होईल, या भीतीने अजूनही टाळे उघडण्यात आलेले नाहीत. परंतु, केंद्र सरकारने कोरोना संक्रमणाच्या काळात जेईईची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहणार आहे. त्यामुळे सरकारने या सर्व परीक्षा तातडीने पुढे ढकलाव्या, अशी मागणी चंद्रपूर शहर अध्यक्ष रितेश(रामु) तिवारी यांनी केली आहे. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी खनके, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल,
नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सकिना अन्सारी,नगरसेवक प्रदीप दे,नगरसेविका विना खनके ,नगरसेवक निलेश खोब्रागडे, अश्विनी खोब्रागडे, अनुताई दहेगावकर, एकता गुरले, युसुफ चाचा, प्रसन्ना शिरवार, रुचित दवे, शिवा राव, कुणाल चहारे , हरीश कोत्तावार, राजेश अडूर, यश दत्तात्रय , राजू भाई, सूरज कन्नूर , तौफिक शेख,सोहेल भाई, रमिज शेख, नौशाद शेख, मोहन डोंगरे, रूचीत दवे, राजू वासेकर, आकाश तिवारी, अनिस राजा, पप्पू सिद्दीकी, मनोज अधिकारी, सुलतान भाई, धर्मु तिवारी,इत्यादि पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या आंदोलनात उपस्थित होते.