⭕चमकदार निळ्या झिंग्याचा शोध⭕
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
_________________________
न्यूयॉर्क :अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर झिंगे (लॉबस्टर) पकडले जातात, पण गेल्या सोमवारी एका मच्छीमाराला अनोखा झिंगा सापडला.https://bit.ly/3iHAQ6e हा झिंगा चक्क चमकदार निळाशार रंगाचा होता. वीस लाखांमध्ये एखादाच झिंगा अशा रंगाचा असतो. असा दुर्मीळ झिंगा सापडल्याने अर्थातच हा मच्छीमार खुश झाला आणि त्याची व झिंग्याची सर्वत्र प्रसिद्धी झाली!
या मच्छीमाराचे नाव वेन निकर्सन. मॅसाच्युसेट्समधील हा मच्छीमार केप कॉडजवळील किनार्याजवळ झिंगे पकडत असतात♍. अन्य अनेक सर्वसाधारण झिंग्यांबरोबरच त्याला हा लाखात उठून दिसणारा सुंदर निळा झिंगाही सापडला. त्याने लगेचच त्याचे ‘ब्लू’ असे नामकरणही करून टाकले! विशेष म्हणजे या मच्छीमाराला 1990 मध्येही एक निळा झिंगा सापडला होता. काही जनुकीय कारणांमुळे झिंग्यामध्ये एक विशिष्ट प्रोटिनचा अभाव निर्माण होतो आणि त्याला असा निळा रंग मिळतो. त्यामुळे अर्थातच हा झिंगा दुर्मीळ म्हणजे वीस लाख झिंग्यांमध्ये एखादाच असतो.♍