Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०६, २०२०

संभाजी महाराज व कवी कलश

  शंभू राजे आणि कवी कलश ह्यांची हृद्य मैत्री 


.        दि.  ६ आॅगष्ट २०२०
जेव्हा छत्रपती राजे श्री शिवराय आपल्या बाळासह म्हणजेच संभाजीराजे यांच्या सह आग्ऱ्याच्या कैदेत होते तेव्हा त्यांना भेटण्याकरिता दोन पंडित आले होते. एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे कवी कुलेश जे अलाहबाद चे होते. ते राजांची कीर्ती ऐकून त्यांना खासे भेटण्याकरिता आलेले.
राजांनी त्या कैदेतून सुटायचे हे अगोदरच ठरवले होते त्यासाठी त्यांनी कवी कुलेश आणि परमानंद यांना राजांनी आणलेले हत्ती, अश्व या पैकी काहीच आग्ऱ्यात ठेवाचे नसल्या कारणाने ते त्यांना भेट दिले असे औरंगजेबाला सांगून ते मथुरेकडे न्यायला सांगितले.
आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर राजे आणि शंभूराजे हे जेव्हा मथुरेला कृष्णाजी पंत व केशव पंत यांच्या घरी मुक्काम केला जे मोरोजी पंत पिंगळे यांचे मेव्हणे होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,लांबचा पल्ला असल्या कारणाने राजांनी आपल्या रुद्ररूपी शंभू बाळांना कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी काही दिवस राहा आम्ही काही दिवसांनी तुम्हाला सुखरूप गडावर सैन्यानिशी आणू त्यावेळी त्यांना कवी कुलेश सोबती होते. खूप दिवस शंभूराजे आणि कवी कुलेश एकत्र मथुरेला होते. त्यात त्यांची मैत्री जुळली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती.
शंभू राज्यांना शिवाजीमहाराजांचा आदेश आला,“तुम्हाला भेटण्यासाठी उत्तर हिंदुस्थानातून २ आसामी आले आहेत त्यांना आपल्याकडे ठेवून घ्यावे. राजे आपल्याकडे येत आहेत.”
थोड्या वेळाने शिवराय त्या भगव्या वस्त्रातील दोन आसामींना घेवून शंभू राज्यांकडे आले.
“यांना आपण ओळखले का ?” महाराजांनी एका असामीकडे बोट दाखवत विचारले. आणि त्या आसामीने कमरेत वाकून मुजरा केला.
“हे कविराज, कवी कलश ”
महाराज एका आसमीकडे बोट दाखवत म्हणाले.
“यांना कोण ओळखत नाही? आग्र्याहून सुटका झाल्यावर यांनीच आपला जीव धोक्यात घालून आम्हास महाराष्ट्रात परत आणले होते” शंभू राजे.
“युवराज ही मंडळी फक्त आपल्या भेटीसाठी आली आहेत आणि चार दिवस राहून परत जायचे म्हणत आहेत पण आम्ही आपले कविमन ओळखून यांना कायमचे इथेच ठेवू घेवू . तुम्हाला काय वाटते?” शिवाजी राजे.
“आपला आग्रह रास्त आहे ”
शंभू राजे आपला झालेला आनंद दाबून ठेवत म्हणाले.
शिवाजीराजे त्याच्याकडे पाहून मनातच हसले. शिवाजी महाराजांची निवड होती! ती चूकीची कशी असू शकते. आयुष्याच्या शेवटपर्यंत कवी शंभूराजांच्या मागे अगदी सावलीप्रमाणे राहिले. हो. कवी होतेच पण प्रसंगी शंभू राज्यांसाठी आपल्या हातात लेखणी सोडून तलवार पकडली.
शंभू राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते कविराज! असे म्हणतात वाईट प्रसंगी आपली सावलीही साथ सोडते पण संभाजी राज्यांची सावली भक्कम होती. तिला लोभ ,मोह, माया या गोष्टीचा नामोनिशान नव्हता
संभाजी राजे तसे तापट स्वभावाचे. त्यांच्या रूपी रुद्रच जन्माला आला होता. त्यांचा स्वभाव पाहता कोणाचे त्यांच्याशी सहज पटेल असे शिवाजी महाराजांनाही वाटले नसेल. कारण वाघ हा एकटाच जंगलाचा राजा असतो. संभाजीराजांनी आपल्या ९ वर्षाच्या कालावधीत अनेक लढाया करून मुघलांना सळो की पळो करून सोडले.
या काळात कविराज शंभूराजांच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहिले. बंधू,सखा,आणि एक निष्ठावंत सेवक अश्या तीन भूमिका त्यांना पार पडायच्या होत्या.
संगमेश्वरला दगा झाला. खानाच्या शिपायांनी अचानक छापा मारून शंभु राजांना व कवी कलश व सैन्यास अटक केली. पकडले गेलेले मावळे कत्तलीसाठी एकत्र केले गेले. सामुहिक कत्तल केली गेली.
शंभू राजे आणि कवी कुलेश यांना बांधून घेवून गेले. कोरेगावच्या शाही तलवार औरंगाजेबला शंभूराजांच्या अटकेची खबर मिळाली आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो तडक निघाला शंभूराजांना पाहायला. पण त्या अगोदर त्या धुर्त माणसाने आपल्या मौलाविकडून शंभू राज्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र वदवून घेतले .
औरंगजेब संभाजी राजांपुढे उभा होता. आजवर त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत कोणालाही झाली नव्हती पण संभाजी महाराजांची नजर तसूभरही ढळली नाही.
“आखे निकाल दो इस काफर की ” औरंगजेब रागाने म्हणाला. आणि त्याने कापडाने बांधलेले तोंड सोडण्याची आज्ञा केली.
”सुवर् के औलाद, हम मराठा सेर जैसे जीते है और शेर जैसे मरते है!”
तोंडावरील कापड सुटताच शंभू राजे कडाडले.
आजवर असा अपमान कोणी केला नव्हता औरंगजेबचा. तो रागाने लाल झाला आणि म्हणाला.
“आखे निकालनेसे पहले इसकी जबान काट डालो. और ये सजाये पहले इस कवी पर आजमाओ ”
औरंगजेब निघून गेला पण कवी कुलेश यांना सजा करावी असे सांगून त्याने फार मोठा डाव खेळला होता. कवी कुलेशाना होणाऱ्या सजा पाहून शंभू राज्याच्या काळजाचा थरकाप होईल, ते जीवाची भीक मागून मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार होतील असे त्याला वाटले.
पण औरंगेबाला माहित नव्हते मराठ्याचा हा छावा आपल्या आईच्या दुधाला जागणारा होता. कवी कुलेशांनी एक नजर शंभू राजांवर टाकली कारण ते परत या डोळ्यांनी शंभू राजांना पाहू शकणार नव्हते. कवी कलशांची पहिली जीभ कापली गेली नंतर हशामानी त्यांचे डोळे काढले. आणि याच शिक्षा नंतर शंभू राज्यांना झाल्या.
एवढ्या शिक्षा झाल्या तरी शंभू राजे आणि कवी कुलेश दयेची भीक मागत नाहीत हे पाहुन इखलास खान अजून चिडला. त्याने नव्या दमाची हशमांची फौज आणली
”देखते क्या हो, उखड दो इन कुत्तोकी खाल और डालो नमक का पाणी इन् काफरो पर”
इखालास खान ओरडला. हशम पुढे सरसावले त्यांनी दोघांची कातडी सोलून काढली आणि त्यावर मिठाचे पाणी टाकले पण दोघांनी आपल्या तोंडातून हू की चू केले नाही.
बाराव्या दिवशी सावलीने साथ सोडली. कवी कुलेशांची प्राणजोत मावळली आणि नंतर शंभू राज्यांना भीमा इंद्रायणीच्या संगमावर देहाची विटंबना करून मारले गेले. अशी ही गाढ मैत्री मृत्यूनंतर संपुष्टात आली पण मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री अखंड होती. अगदी मजबूत साखळदंडाप्रमाणे.
शंभुराजे आणि कवी कलश यांच्या मैत्रीला मानाचा मुजरा!
*||जय भवानी जय शिवराय||*
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

शंभू राजे आणि कवी कलश ह्यांची हृद्य मैत्री


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.