Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०६, २०२०

छ. शिवरायानी बांधलेला पुल

*⭕शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????⭕*
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगा
_________________________
प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे *१६५६-१६५८* या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत,त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते.पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो.हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल
अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे,दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा ३०सेमी/१ फूटी दगडी कठाडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत,पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत,काही शतक देखभाल न कराव लागण हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.