कोरोना संसर्ग वाढण्याचा धोकादायक प्रकार
तहसील कार्यालयामध्ये सोशल डिस्टंसिंग नियमाचे उल्लंघन
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
कोरोना संसर्ग ग्रामीण तसेच नागपूर शहरात झपाट्याने वाढत आहे.अश्या परिस्थितीत सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यासह सामाजिक अंतर ठेवण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत.परंतु नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सामाजिक अंतराचा फज्जा उडताना दिसत आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवार १७ ऑगस्ट रोजी नागरीक त्यांच्या कामासाठी तहसील कार्यालयाच्या सेतूवर पोहोचले तेव्हा तिथे सामाजिक अंतराचा धज्जा उडाला असल्याचे दिसून आले .
नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सेक्युरिटी गार्ड नसल्याने लोक आपल्याच मनमर्जीप्रमाणे लाइनमध्ये उभे राहतात . तहसील माये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सामाजिक अंतर ठेवले होते .पण तहसीलमध्ये प्रवेश केलेल्या बाहेरील लोकांमुळे सोशल डिस्टंसिंग नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे . नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयाला कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी तहसीलदार मोहन टिकले यांनी या विषयाकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे .