एकुण ५० कोरोनाबाधीत
२६५ प्रक्षिक्षणार्थी यांची केली तपासणी
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर तालुक्यातील सुराबर्डी येथील नक्षल विरोधी अभियानाच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ४८ जणांना कोरोना बाधीताची लागण झाल्यामुळे स्थानीक प्रशासन खळबळून जागे झाले आहे.
मंगळवार ४ ऑगस्ट रोजी ३७ कोरोनाबाधीत तर बुधवार ५ ऑगस्ट रोजी ११ कोरोनाबाधीत आढळले आहे . सुराबर्डी ग्रामपंचायतच्या अंतर्गत नक्षल विरोधी प्रशिक्षणाचा परिसर आहे . येथे नक्षली चळवळीच्या विरोधात कसा सामना करायचा त्यासंबधीचे प्रशिक्षण दिले जाते . १५ दिवसापासून विविध जिल्हयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते.तीन दिवसापूर्वी प्रशिक्षणात सहभागी झालेले दोन कर्मचारी कोरोना बाधीत झाल्यामुळे प्रशिक्षणात असलेल्या २६५ प्रशिक्षणार्थी यांची कोरोना चाचणी केली असता ४८ कोरोना बाधीत आढळले . याची माहीती ग्रामपंचायत सचिव मनिष रावत यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन योग्य ती कारवाई करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ . सुषमा धुर्वे ,शीतल पखीड्डे ,दिक्षा मेश्राम ,नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले गटविकास अधिकारी किरण कोवे ,विस्तार अधिकारी श्री चव्हाण ,शाखा अभियंता श्री .पंखराज ,सरपंच सौ. भावनाताई तायडे ,उपसरपंच सौ. वनीताताई कापसे ,ग्रा. पं. लिपीक शेषराव कोहळे ,सुभाष तायडे, दिपक राऊत हजर होते.