Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०३, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 580


349 झाले बरे 230 वर उपचार सुरू
जिल्हाधिकाऱ्यांनी केली रुग्णालयाची पाहणी


चंद्रपूरदि.2 ऑगस्ट : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेताजिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली. विशेषत: त्यांनी रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व अन्य समस्यांची पाहणी केली. काल पहिला मृत्यू झाल्यानंतर उपचार पध्दत व आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरांची पहाणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सीसीटीव्हीची पाहणी करीत असताना सीसीटीव्ही यंत्रणा आणखी सक्षम करावीअसे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णांची संख्या बघता जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त मनुष्यबळा संदर्भात पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 580 वर पोहोचली आहे काल जिल्ह्यामध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 349 बाधित बरे झाले आहेत तर 230 बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरातील 5 पॉझिटिव्हचा  समावेश आहे. चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हा व्यक्ती आहे.
अंचलेश्वर गेट परिसरातील 20 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. करीमनगर येथून प्रवास केल्याची त्याची नोंद आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापुर वार्ड बस स्टॉप जवळील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हे चाळीस वर्षीय महिला बाधित आढळली आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एका 58 वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर येथीलच सिस्टर कॉलनी परिसरातील 58 वर्षीय अन्य जिल्ह्यातून प्रवास करून आलेली 58 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यातील 12 पॉझिटिव्ह पुढे आले आहे. यातील पाच जण हे यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील आहेत. तर अन्य 6 जण अन्य जिल्ह्यातून प्रवास करून नागभीड तालुक्यात पोहोचल्याची नोंद आहे.
कोरपना तालुक्यातील दोन रुग्णांची नोंद झाली आहे. शास्त्रीनगर आवारपूर येथील रुग्ण आणि वार्ड नंबर 6 कोरपणा येथील रुग्णाचा समावेश आहे.
     ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन पॉझिटिव्ह आजच्या यादीत पुढे आले आहे. यापैकी एक ब्रह्मपुरी शहर तर दुसरा रानबोथली येथील संपर्कातील पॉझिटिव्ह आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील संपर्कातील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह ठरला आहे. तर भद्रावती तालुक्यातील 3 जण पॉझिटिव्ह ठरले आहेत. यापैकी 2 जण पुणे येथून प्रवास करून आल्याची त्यांची नोंद आहे.
चिमूर तालुक्यातील पीपराडा पळसगाव येथील संपर्कातील एक आणखी पॉझिटिव्ह पुढे आला आहे.अशाप्रकारे सायंकाळी आठ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या 580 झाली आहे.
जिल्ह्यात 7 हजार 981 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 54 पॉझिटिव्ह असून 7 हजार 927 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 90 हजार 696 नागरिक  दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 92 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 425 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी 570 बाधित पुढे आले आहेत. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 12 बाधित16 ते 18 वर्ष वयोगटातील 33 बाधित19 ते 40 वर्षे वयोगटातील 367 बाधित41 ते 60 वर्षे वयोगटातील 140 बाधित61 वर्षावरील 18 बाधित आहेत. तसेच एकूण 570 बाधितांपैकी 412 पुरुष तर 158 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरीलजिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
 रविवारी सायंकाळी पुढे आलेल्या 570 बाधितांपैकी जिल्ह्यातील 483 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 38 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 49 आहे.
जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती:
जिल्ह्यात सध्या 59 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 74 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 74 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 312 आरोग्य पथकाद्वारे 13 हजार 874 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 55 हजार 12 आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.