Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०३, २०२०

राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा



भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ दि. ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावेअसे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राज्यातील जनतेला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीदि. ५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मा. मोदीजींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.
ते म्हणाले कीमंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहेअसे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावीगुढी उभारावीघरावर कंदिल लावावाघरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.
त्यांनी सांगितले कीदि. ५ ऑगस्टच्या समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा. सामुहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामुहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत.

मा. अमितभाई लवकर बरे होवोत

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीकेंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह कोरोना पॉझिटीव असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमितभाईंचीही श्रद्धा आहे. आपण अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो कीअमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.