Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १९, २०२०

23 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा


उमेदवारांना सहभागी होण्यासाठी
ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती
चंद्रपूर,दि.18 जुलै: जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दिनांक 23 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी नाव नोंदणी करावी. यासाठी उमेदवारांकरीता संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावाअसे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
ही असणार ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती:
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणीआधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वन या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा.आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर पात्रतेनुसार जुळणारे विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनावर क्लिक करा.
उद्योजकांसोबत व्हाट्सअपगुगल मिटव्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी काही अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत 07172-252295 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.