Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २१, २०२०

महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या कन्या रुग्णसेवेत





मा. महापौरांनी केले आरोग्ययोद्धा डॉ. केतकी राजेश मोहिते यांचे अभिनंदन !

चंद्रपूर २१ जुलै - गेल्या अनेक दिवसांपासून समाजातल्या प्रत्येकाचा विविध आघाड्यांवर कोरोना आजाराची लढा सुरू आहे. हा लढा आणखी किती काळ सुरु राहणार याचा अंदाज बांधणे सद्यस्थितीला कठीण आहे. या लढ्यात अनेक अशी नावे आहेत जी तुमच्या आमच्यासारखी आहेत, मात्र त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. असेच एक नाव आहे डॉ. केतकी राजेश मोहिते.
चंद्रपूरच्या असलेल्या डॉ. केतकी राजेश मोहिते या लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपुर येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. केतकी सुद्धा आपले घर, शहर सोडून आज अनेक आरोग्यदूताची भूमिका बजावीत रुग्णांच्या जीवनासाठी लढा देत आहेत.
मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या मार्गदर्शनात २१ जुलै रोजी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी डॉ. केतकी राजेश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे वडील मनपा आयुक्त श्री. राजेश मोहिते व आई सौ. अर्चना राजेश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या व संकटकाळात आपले कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. केतकी मोहिते यांचे कौतुक केले.
कोरोना रुग्णांची सेवा करणे हे किती धैर्याचे काम आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. या दरम्यान कोरोना सदृश रुग्णांशी संपर्क येत असल्याने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. मात्र याची पुरेपूर कल्पना असून सम्पुर्ण देशातील आरोग्य यंत्रणा आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. श्री. राजेश मोहिते हे मनपा आयुक्त या नात्याने चंद्रपूर शहरवासीयांसाठी कोरोना लढ्याच्या अग्रस्थानी आहेत. त्यांची कन्याही रुग्णांच्या सेवेत आहे, एका अर्थाने संपूर्ण मोहिते कुटुंबीयच कोरोना लढ्यात सहभागी आहे. चंद्रपूरच्या डॉ. केतकी मोहिते या आरोग्ययोद्धा असून नागपूर येथे आपले कर्तव्य बजावीत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक श्री. संजय कंचर्लावार, श्री संदीप आवारी, श्री. रवी आसवानी, श्री. देवानंद वाढई, ॲड. राहुल घोटेकर, छबूताई वैरागडे उपस्थित होते.
कोरोना लढ्यात मी माझ्या परिवारासहीत सहभागी आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो. कोरोना हे एक आव्हान असुन एक संधी सुद्धा आहे. प्रत्येक कोरोना योद्धयाला आमचा सदैव पाठींबा राहील. नियमांचे पालन करून कोरोनाला हरविण्याची संधीचा आपण उपयोग करायला हवा. - आयुक्त श्री. राजेश मोहिते.

' सलाम त्यांच्या कर्तव्याला ' मा. महापौर राखी कंचर्लावार यांचा उपक्रम..
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची जी मानसिक स्थिती असते तीच आज या कोरोना काळात इतर ठिकाणी वैद्यकीय कर्तव्य बजाविणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांची आहे. आपल्या शहरातील ज्या कुटुंबीयांची मुले चंद्रपुरबाहेर वैद्यकीय सेवा देत आहे, कुटुंबियांपासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांसोबत काम करीत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहून लढ म्हणणाऱ्या या कणखर आई - वडीलांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम आहे.
या उपक्रमाअंतर्गत कोरोनायोध्यांचे कुटुंबीय - श्री शरद रामावत, डॉ. एम. जे. खान, श्री बलराम डोडानी ,डॉ. नरेंद्र कोलते, श्रीमती पौर्णिमा मेश्राम, श्री मुरलीधर रडके, डॉ. प्रमोद बांगडे, श्री भास्कर सुर, श्री अशोक बंग, डॉ. अजय गांधी, श्री संजय खोब्रागडे, श्री गजानन आसुटकर, श्री लेमचंद्र दुर्गे, डॉ. रमण ,डॉ. सुशिल मुंधडा, श्री दामोधर सारडा, श्री दिनेश साधनकर, श्री प्रदीप ठक्कर, श्री अलोक धोटेकर, डॉ. मुरलीमनोहर नायडू व श्री. राजेश मोहिते - यांचे अभिनंदन करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.