नागपूर / अरुण कराळे (खबरबात ):
नागपूर जिल्ह्याला हादरुन सोडणाऱ्या कळमेश्वर शहरातील गोळीबार प्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह एकूण दहा आरोपींना गजाआड केले आहे. ही कारवाई घटनेपासून २४ तासातच गुन्हे शाखेने पूर्ण केल्याने स्थानिक स्तरातून गुन्हे शाखेचे अभिनंदन केले जात आहे.
सोमवार २० जुलै २०२० रोजी सकाळी ११. ३० वाजता पोलीस स्टेशन कळमेश्वर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री निकेतन कॉलनी मधील लोहकरे लेआऊट येथे अज्ञात गुन्हेगारांनी जुन्या वैमनस्याचा कारणावरून जखमी गणेश मेश्राम आणि त्याची पत्नी प्रियंका मेश्राम यांना जिवानिशी ठार करण्याच्या इराद्याने घरात घुसून अग्नि शस्त्राने गोळीबार करून दोघांनाही गंभीर जखमी केले होते याबाबत कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे आरोपी गोलू मल्लिये रा.नागपूर, फारुख खान रा. नागपूर ,शोविन माकोडे रा. कळमेश्वर व त्याचे इतर तीन ते चार अज्ञात सहकाऱ्यांविरुद्ध कलम ३०७ ,३४ आर्म एक्ट कलम ३ / २५ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला यांच्या आदेशान्वये पुढील तपास नागपूर गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पोलिस स्टेशन कळमेश्वर आणि घटनास्थळावर विनाविलंब भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जीट्टावार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघड करण्याचे निर्देश दिल्याने पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावर आणि त्यांच्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीन विशेष पथक तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली तपासादरम्यान गोपनीय सूत्रांच्या मदतीने गोलू मलिये, फारुख खान, शोविन माकोडे कळमेश्वर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अधिकचा तपास करून जखमी गणेश मेश्राम व आरोपी गोलू मलिये यांचे जुने वैमनस्य चे कारणावरून अंदाजे १५ दिवसापूर्वी पोलीस स्टेशन प्रताप नगर नागपूर शहर हद्दीत वाद झाला होता
या माहितीच्या आधारे जयताळा परिसरात अधिकची माहिती घेतली असता त्याने आपले इतर सहकारी चे मदतीने गुन्हा केल्याचे सांगितल्या वरून इतर सहकारी आरोपींना नागपूर शहरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यात आला. निखिल उर्फ गोलू उर्फ लालसिंग मलिये याने गुन्ह्यातील जखमी गणेश मेश्राम हा कळमेश्वर मध्ये कोठे राहतो याची माहिती आरोपी मित्र फारूक उर्फ जबी उल्लाखान यास काढण्यास सांगितले.
त्याप्रमाणे आरोपी शोविण उर्फ अरविंद माकोडे याने फारुख खान यास जखमी गणेश मेश्राम रहात असलेल्या या ठिकाणाचा पत्ता काढण्यास मदत केली त्यानंतर १२ ते १५ दिवसातच निखिल उर्फ गोलू मल्लीये ने सहकारी हिमांशु रविशंकर चंद्राकर २४ रा. गजानन नगर त्रिमूर्ती नगर नागपूर, मोहम्मद हैदर उर्फ परवेज अन्सारी वय २० वर्ष रा. बंगाली पंजा पिली मारबत चौक नागपुर, अंकित रामचंद्र धूर्वे वय १८ वर्ष एकलता नगर नागपुर, चंद्रकांत सुरेश शिंदे वय ३२ वर्ष दाते लेआऊट जयताळा नागपूर, अभिषेक मंगेश गिरी वय १९ वर्ष रा. पाचपावली नागपूर, अंकित तुळशीराम निमजे वय २४ वर्ष रा. पाचपावली ,गौरव अजय पिल्ले वय २२ वर्ष रा. रेल्वे कॉलनी नागपूर, या सर्वांनी कट रचून जखमी गणेश मेश्राम व त्याची पत्नी प्रियांका गणेश मेश्राम यांना त्यांचे राहते घरी घरात घुसून अग्नी शास्त्राने जीव घेण्याच्या इराद्याने गोळीबार करून गंभीर जखमी केले असल्याचे सांगितले यावरून एकूण १० आरोपींना ताब्यात घेऊन तपासाकरिता पोलीस स्टेशन कळमेश्वरचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार ,ठाणेदार मारुती मुळक ,सह पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, पोलीस हवालदार सचिन मते ,जावेद शेख, जयप्रकाश शर्मा, रमेश भोयर, महेश जाधव ,संतोष पांढरे, मदन आसत्कर ,सूरज परमार ,निलेश बर्वे ,सुरेश गाते, दिनेश अाधा पुरे, राधेश्याम साखरे ,रोहन डाखोरे ,कविता साखरे ,साहेबराव बहाळे ,भाऊराव खंडाते ,अमोल कुथे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कळमेश्वरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मारुती मुळूक करीत आहे.