Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै ०१, २०२०

चंद्रपूर तुकूम व मूल तालुक्यात सुशी गावात प्रत्येकी एक बाधित

Coronavirus India update in Hindi: Latest news dashboard on Corona ...
चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.  
       आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या २८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
      तर दुसरा ३० वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.
       जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) आणि १ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९८ झाले आहेत. आतापर्यत ५४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ९८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४४  झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.