नागपूर : ताडोब्यातील तीन वाघांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत असतांना पुन्हा शिकारीची घटना समोर आली आहे. आता ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या सीमेवर पिंपळखुट येथे एका वाघाचे हाड आणि इतर अवयव मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वन विभागाने सात जणांना ताब्यात घेतले आहे. हे क्षेत्र चंद्रपूर वन विभागाचे अंतर्गत येते.
चार वर्षांपूर्वी ताडोबा बफर क्षेत्रालगत वाघाची शिकार केली गेली. त्यानंतर मृतदेह एक खड्डा करुन गाडण्यात आला. या शिकारीचे बिंग फुटल्यानंतर गुरुवारी पुन्हा खड्डा खोदून वाघाची हाडे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण ७ जणांना ताब्यात घेतले आहे. वन विभागाने आरोपींकडून वाघाची नखे, हाडे व इतर साहित्य जप्त केले असून तपास सुरु आहे.