Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०४, २०२०

लॉकडाऊनच्या काळातही किरायादाराला केले बेघर, एका लाखाचे नुकसान

लॉकडाऊनमध्ये पण 'किरायाचे घर,खाली कर'
वाडी पोलिसात तक्रार न स्विकारल्यामुळे किरायादाराने केली नागपूरचे पोलीस आयुक्त ,DCP कडे तक्रार
नागपूर/अरूण कराळे:
लॉकडाऊनच्या काळात किरायादाराला घरभाडे दिले नाही म्हणून घर खाली करण्याकरीता तगादा लावता येत नाही तरीही वाडी पोलीस स्टेशन अतंर्गत असलेल्या नवनीत नगर येथील एका घर मालकीनने भाडेकरूच्या घरातील संपूर्ण सामान भर पावसात बाहेर काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली . पाण्यातच सामान बाहेर काढल्यामुळे सामानाची नासधुस झाली आहे. 

या प्रकरणाची तक्रार दिपक व्यंकट डाहाट वय ५५ यांनी वाडी पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेले . परंतू वाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार न घेतल्यामुळे त्यांनी तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त व डीसीपी कडे केली . सविस्तर वृत्त असे आहे की नवनीत नगर रहीवासी मिलिंद दहीवले मुंबईमध्ये राहतात.त्यांनी स्वतःचे घर मागील तीन वर्षापासून दिपक डाहाट यांना किरायाने दिले होते. दि. २० नोव्हेंबर २०२० पर्यंत किरायाने राहण्याचा करार केला तरीही . दहीवाले यांची पत्नी घर सोडण्यासाठी वर्षभरापासून भाडेकरूचा छळ करीत आहे.घर रिकामे न केल्यामुळे घरमालकच्या पत्नीने भाडेकरूचे सर्व सामान सोमवार १ जुन घराबाहेर फेकले.

तसेच डाहाटच्या पत्नीला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल झाला आहे.भाडेकरूचे सर्व सामान पावसात ओले झाल्यामुळे खराब झाले आहे.ज्यामध्ये पीडित दिपक डाहाट यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली. या विरुद्ध तक्रार करण्याकरीता दिपक डाहाट हे वाडी पोलीस स्टेशन मध्ये सोमवार पासून चक्करा मारत आहे परंतु वाडी पोलिसात तक्रार न स्वीकारल्यामुळे डाहाट परिवार नागपूरचे पोलीस आयुक्त व डीसीपीकडे तक्रार दाखल केली .

घर मालकीन सौ. दहीवले यांचा आरोप आहे की मागील एक वर्षापासून भाडेकरूने किराया दिला नाही.नेहमी भांडण करीत असतात. मला घराचे काम करायचे आहे.त्याकरीता घर रिकामे करण्यास सांगत आहे.परंतु भाडेकरू घर खाली करीत नाही आहे.कित्येकदा वाडी पोलिसात तक्रार केली परंतु पोलिसांनी एनसी व्यतिरिक्त काहीच कारवाई केली नाही.ज्यामुळे भाडेकरू आणखी उन्नत झाले.
प्राप्त माहितीनुसार घर मालक मिलिंद दहीवाले मुंबई मध्ये राहतात.लॉकडाऊन असल्यामुळे वाडीत पोहोचले नाही .पत्नी नवनीत नगर वाडी मध्ये राहते.घर पतीच्या नावावर असल्याने त्यांनी भाडेकरूशी करार केला आहे .परंतु पत्नीला हि बाब पटली नाही .तर ती भाडेकरूना घर खाली करण्यास सांगत आहे. घरमालक मिलिंद दहीवले भाडेकरूला घर खाली करू नको असे सांगत आहे . त्यामुळे घरमालक पती पत्नी च्या वादात किरायदार विनाकारण भरडल्या जात आहे. 
प्रतिक्रीया
माझ्या मालकीचे घर असून मी स्वतः भाडेकरूंना २० नोव्हेंबर २०२० पर्यंत राहण्याचा करार केला आहे. भाडेकरूला खोलीतून काढणे हा माझ्या पत्नीचा हक्क नाही.माझे भाडेकरू चांगले आहेत पण माझी पत्नी त्यांना दूर करित आहे.भाडेकरूंचे सामान काढून त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
घर मालक मिलिंद दहीवले,नवनीत नगर वाडी

फिर्यादी दीपक डाहाट यांनी आपले सामान परत नेले आहे. त्यांच्यातला वाद मिटला आहे त्यामुळे त्यांची तक्रार दाखल केली नाही .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक 
वाडी पोलीस स्टेशन

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.