विद्यूत महावितरणाच्या मुख्य अभियंता यांना सुचना
चंद्रपूर(खबरबात):
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग तिन महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. यामूळे अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावला गेला. आता लॉकडाऊन शिथील होताच विद्यूत महावितरणच्या वतीने नागरिकांना लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांचे एकत्रीत बिल पाठविले हे बिल रिडींग न घेता सरासरीच्या आधारे पाठविण्यात आले आहे. मात्र अनेकांना सरासरीपेक्षा अधिक देयक आकारण्यात आल्याच्या तक्रारी येत असून या बिल आकारणी बाबत नागरिकांच्या मनात शंका आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग तिन महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. यामूळे अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावला गेला. आता लॉकडाऊन शिथील होताच विद्यूत महावितरणच्या वतीने नागरिकांना लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांचे एकत्रीत बिल पाठविले हे बिल रिडींग न घेता सरासरीच्या आधारे पाठविण्यात आले आहे. मात्र अनेकांना सरासरीपेक्षा अधिक देयक आकारण्यात आल्याच्या तक्रारी येत असून या बिल आकारणी बाबत नागरिकांच्या मनात शंका आहे.
त्यामूळे नागरिकांच्या संभ्रम दुर करण्यासाठी विद्यूत महावितरणाच्या वतीने तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात यावे व नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण झाल्याशिवाय लॉकडाऊन काळातील विज बिल भरण्याची सक्ती केल्या जावू नये अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यूत महावितरणचे मुख्य अभियंता सूनिल देशपांडे यांना दिल्या आहेत.
विज बिल बाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यूत महावितरणाच्या मूख्य अभियंता सुनिल देशपांडे यांची भेट घेतली यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या विद्यूत बिलाच्या तक्रारीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, विश्वजित शाह, ऋषभ परचाके आदिंची उपस्थिती होती.
सध्या संपूर्ण देश कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोजना करीत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमूळे जनजिवनावर परिणाम झाला आहे. सध्या राज्यातील काही भागात संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. चंद्रपूरातील संचारबंदीतही प्रशासनाच्या वतीने शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी मागील तिन महिने कडकरित्या पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे जनजिवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. या टाळेबंदीत अनेकांच्या हाताचा रोजगार गेला आहे. वाहतूक, नवे बांधकाम, छोटे व्यवसाय बंद राहल्याने यावर अवलंबून असलेल्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामूळे अद्यापही जनजिवन पूर्णताह रुळावर आलेले नाही. त्यातच आता विद्यूत विभागाच्या वतीने लॉकडाऊन काळातील तिन महिण्याचे एकत्रीत विज बिल नागरिकांना पाठविले आहे.
रिंडीग न घेता सरासरीच्या आधारे हे बिल आकारण्यात आले आहे. मात्र आकारण्यात आलेले हे बिल सरासरी पेक्षा अधिक असल्याच्या तक्रारी आहे. अनेकांना १० ते १७ हजारांपर्यत बिल आकारण्यात आले आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये या विज बिलाबाबत संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता महावितरणच्या वतीने तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात यावे, तक्रारींचे निराकरण झाल्याशिवाय लॉकडाऊन काळातील विज बिल भरण्याची ग्राहकांना सक्ती करण्यात येवू नये, लॉकडाऊन काळातील बिलावर अतिरिक्त शूक्ल आकरण्यात येवू नये, अशा सूचना आज शूक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यूत महावितरणचे मूख्य अभियंता सूनिल देशपांडे यांना केल्या आहेत.