Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०५, २०२०

चंद्रपूरातील भिवापुर वॉर्ड परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ:जिल्ह्यातील बाधीताची संख्या पोहचली २७ वर

Novacyt shares jump 32% on launch of coronavirus test
चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपूर महानगरातील भिवापुर वॉर्ड परिसरातील एक ६२ वर्षीय व्यक्ती शुक्रवार दिनांक ५ जून रोजी कोरोना बाधित आढळले.जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रुग्ण म्हणून अती दक्षता कक्षात दाखल बाधीताच्या स्वॅबचा अहवाल आज ५ जून रोजी पॉझिटीव्ह आला. 

त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप व खोकला होता. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते काल ४ जून रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. 

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २७ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ५ आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.