नागपूर/प्रतिनिधी:
कोरोनापेक्षाही अपोकॅलिप्टिक व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो आणि त्यासाठी पोल्ट्री फार्म्स जबाबदार असतील हे ऑस्ट्रेलियन शास्रज्ञ मायकल ग्रेगरी यांचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कुक्कुटपालनातील शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे यांनी केला आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क:9175937925 |
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे.
ग्राहक नसल्याने देशातील लाखो पोल्ट्री फार्मरवर जिवंत कोंबडी फुकटात
वाटण्याची वेळ आली असतांनाच आता आणखी पोल्ट्रीत नवीन व्हायरसची चर्चा जोर धरत आहे. या बातमीमुळे सर्व पोल्ट्रीफार्मर चिंतेत आहेत.
गेल्या आठवडा भरापासून पोल्ट्रीफार्मिंगमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर
असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता ऑस्ट्रेलियातील आहार तज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांनी वर्तविली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन शास्रज्ञ मायकल ग्रेगरी यांचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कुक्कुटपालनातील शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे यांनी केला आहे.
मायकल ग्रेगारच्या याच एका वृत्तवाहिनेमध्ये बातमी प्रसिध्द केली.बघता बघता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पोल्ट्री संबंधित संपूर्ण सोशल मिडियावरील ग्रुपमध्ये पसरू लागली आणि याच बातमीने देशातील सर्व पोल्ट्रीफार्मरला पुन्हा चिंतेत टाकले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क:9175937925 |
परंतू ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.तसेच ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूचा कोबड्यांना बाधीत करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवार पशुंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई
संस्थेनेही असा रोग अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क:9175937925 |
आधीच कोरोनामुळे शेतीला जोडधंदा असणारा हा व्यवसाय आज प्रचंड तोट्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिक व शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु मात्र चिकन मधून कोरोना होतो या अफवेने देशातील पोल्ट्री उद्योग देशोधडीला लागला.
महाराष्ट्र हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशातील काही अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. सन २०१९ च्या विसाव्या पशू गणनेनुसार राज्यांमध्ये एकूण कुकुट संख्या सात कोटी ४२ लाख इतकी आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात वाढवण्यात येणाऱ्या अंड्यावरील व माणसाला पक्ष्यांची संख्या पाच कोटी ६ लाख इतकी असून परसातील कुक्कुट पक्ष्यांची संख्या २ कोटी २१ लाख एवढी आढळून आली आहे करोना व्हायरस बाबतची चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे अंडी आणि चिकन मागणी कमी झाली असून त्याचा परिणाम किमतीवर देखील झाला आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क:9175937925 |
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडील अंड्यांची सरासरी विक्री म्हणजेच फार्म gate प्राईस दिनांक १ जानेवारी २०२० रोजी चार रुपये ६७ पैसे प्रति अंडी होती आणि त्यात एक फेब्रुवारी रोजी घसरण होऊन ती तीन रुपये ६७ पैसे इतकी झाली. मात्र ११ मार्च रोजी त्यांची किंमत ही फक्त दोन रुपये ९५ पैसे एवढी कमी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच राज्यातील मंसाल पक्ष्यांची विक्री दिनांक १ फेब्रुवारी रोजी ३४१४.२६ मेट्रिक टन इतकी होती आणि त्याची किंमत ही सरासरी रुपये ७०.८४ प्रतिकिलो एवढी होती मात्र ९ मार्च रोजी ही विक्री फक्त २१३७.२६ मेट्रिक टन इतकी असून किंमत फक्त रुपये १५.२५ प्रति किलो एवढी झाली आहे.
त्यामुळे आता चिकन सेफ आहे तुम्ही खाऊ शकता
ही बातमी डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखीत पुस्तकावर आधारित आहे. व डॉ. मायकल ग्रेगर हे आहार तज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे
व सदरील बातमी शास्त्रीयरित्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात
असा एखादा व्हायरस येवू शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी
मांडल्याचे दिसून येत असल्याचे सुनिल केदार यांनी सांगितले.
४) https://youtu.be/JedJ61ekoUc
यशस्वी पोल्ट्रीफार्मिंग संबंधित अधिक व्हीडीओ बघण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करा
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध
संपर्क:9175937925